शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीच्या विरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:26 IST

एमआयडीसीची पुनर्वसन भूखंड वाटप योजना वादात सापडली आहे.

नवी मुंबई : एमआयडीसीची पुनर्वसन भूखंड वाटप योजना वादात सापडली आहे. संपादित भूखंडाच्या क्षेत्रफळाइतकाच भूखंड एका लाभधारकाला देण्याचा प्रताप एमआयडीसी प्रशासनाकडून झाला आहे. त्यामुळे आम्हालाही आमच्या संपादित जमिनी इतकाच मोबदला मिळावा, असा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. त्यासाठी विविध संघटना आक्रमक झाल्या असून एमआयडीसीविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांना १९९४ च्या शासन परिपत्रकानुसार संपादित जमिनीचा मोबदला म्हणून १00 मीटरचा भूखंड देण्याचे धोरण आहे. असे असतानाही सावली गावातील प्रकल्पग्रस्त कॅप्टन नगीनदास शहा यांना संपादित जमिनीचा मोबदला म्हणून तितक्याच आकाराचा भूखंड दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या दुटप्पी धोरणाविषयी प्रकल्पग्रस्तांनी संताप व्यक्त केला आहे.शासनाने टीटीसी औद्योगिक वसाहतीसाठी येथील प्रकल्पग्रस्तांच्या शेतजमिनी संपादित केल्या. त्याबदल्यात प्रकल्पग्रस्तांना १00 मीटर क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचे धोरण आखण्यात आले. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या सातबाऱ्यावरील नावांनुसार भूखंडाचे वाटप केले जाते. या धोरणानुसार आतापर्यंत सुमारे २१५0 अर्जदारांना भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. परंतु या भूखंड वाटप धोरणाला कॅप्टन नगीनदास शहा अपवाद ठरले आहेत. त्यामुळे आम्हालाही कॅप्टन नगीनदास शहा यांच्याप्रमाणे संपादित जमिनी इतकाच मोबदला मिळावा, असा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. भूखंड वाटपाच्या मूळ धोरणाला हरताळ फासून एमआयडीसीने कॅप्टन नगीनदास शहा यांच्यावर विशेष मेहरनजर केली आहे. याच धर्तीवर आम्हालाही संपादित जमिनीइतकाच मोबदला मिळावा, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. त्यासाठी बुधवारी महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त शेतकरी संघाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण जाहीर केले आहे. एमआयडीसीच्या महापे येथील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाशझोत संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी दिली.