शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

एलिव्हेटेड रस्ता झाला चकाचक

By admin | Updated: August 28, 2015 23:22 IST

रस्ते विकास महामंडळाने एमएसआरडीसीकडून निधी घेऊन पनवेलमध्ये एलिव्हेटेड रस्ता बांधला. मात्र त्यानंतर महामंडळाने सर्वच बाबतीत दुर्लक्ष केल्याने पुलाखाली मोठ्या प्रमाणात

पनवेल : रस्ते विकास महामंडळाने एमएसआरडीसीकडून निधी घेऊन पनवेलमध्ये एलिव्हेटेड रस्ता बांधला. मात्र त्यानंतर महामंडळाने सर्वच बाबतीत दुर्लक्ष केल्याने पुलाखाली मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात भिकारी, गर्दुल्ल्यांनी याठिकाणी कब्जा केला. या एलिव्हेटेड पुलाच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला असून या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.माती, कचरा, गवत काढण्याचे काम आरोग्य विभागाने गेल्या काही दिवसांपासून सुरू केले आहे. त्याचबरोबर लवकर पुलावरही सफाई करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. पनवेल शहरातून जाणाऱ्या या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. ही कोंडी टाळण्यासाठी गार्डन हॉटेल ते तक्कादरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्यात आला. पूर्वी हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. त्यानंतर तो रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. निधीअभावी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एलिव्हेटेड रोडला निधी दिला. त्यानुसार हा पूल उभारण्यात आला असून दोन वर्षांपूर्वी वाहतुकीकरिता खुला करण्यात आला. या ठिकाणी पथदिवे बसविण्यात आले असले तरी त्याचे वीजबिल भरण्याकरिता महामंडळाने हात वर केले. त्यामुळे कित्येक महिने हा रस्ता अंधारात होता. पनवेल नगरपालिकेने बिलाची जबाबदारी उचलल्याने पुलावरील पथदिवे उजळले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात माती साचल्याने पावसात वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले होते. याच महामार्गावर शेडूंग येथे आयआरबी टोल वसूल करते. त्यामुळे पनवेल शहरातून जाणाऱ्या महामार्गाची देखभाल करणे या एजन्सीची जबाबदारी आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याचा त्रास पनवेलकरांना होत होता. (वार्ताहर)शहरात नालेसफाई: पनवेल बसस्थानक ते गार्डन हॉटेल या दरम्यानचा परिसर स्वच्छ करण्याचे काम जवळपास झाले आहे. बसस्थानक बाजूच्या पावसाळी नाल्याची सफाई करण्यात आली. वास्तविक ही जबाबदारी एमएसआरडीसीची होती मात्र पनवेलकरांच्या हिताकरिता हे काम केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.वाहने घसरतात : पुलावरील पावसाचे पाणी खाली जावे याकरिता ठिकठिकाणी जागा ठेवण्यात आली आहे. मात्र त्यात माती आणि कचरा बसल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे सखल भागात पाणी साचून राहात आहे. रस्त्यावर चिखल झाल्याने वाहने घसरण्याचे प्रकार या ठिकाणी घडतात.