शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन मंडळाच्या ‘बसला’ही इलेक्शन ड्युटी !

By admin | Updated: February 22, 2017 06:49 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमुळे मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे, इतर साहित्य व कर्मचारी

अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमुळे मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे, इतर साहित्य व कर्मचारी पोहोेचविण्याच्या कामावर सोमवारपासून मुंबई आणि रायगड विभागातून मोठ्या प्रमाणात एसटी सोडण्यात आल्या. निवडणूक यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात बस लागल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक कोलमडून गेली होती. बस थांब्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी गेल्या दोन दिवसांपासून दिसून येत आहे.साहित्य आणि कर्मचारी मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्याकरिता पनवेलसह रायगड जिल्ह्यातील विविध आगारांतून मोठ्या प्रमाणात बसेस निवडणूक विभागाला उपलब्ध करून देण्यात आल्या. या गाड्या मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी शासकीय कार्यालय, तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी थांबवल्या होत्या. रायगडातील बहुतांश आगारातून ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या गाड्याच प्राधान्याने या सेवेसाठी दिल्या होत्या. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच ग्रामीण भागात एसटी गेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यासाठी तसेच इतर कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत सहा आसनी व इतर वाहनांचा धंदा तेजीत दिसला. एसटीबरोबरच खासगी स्कूल बसही निवडणुकीच्या कामावर लावल्या आहेत. त्यांचा परिणाम विद्यार्थी वाहतुकीवर काही प्रमाणात झाला. सर्वात जास्त झळ पनवेलकरांना सहन करावी लागली. पनवेल बस आगारातून एकूण २० बसेस निवडणुकीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. सोमवारी दिवसभर मतदान यंत्राबरोबर इतर साहित्य आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले. त्याचबरोबर मंगळवारीही मतदान असल्याने या बसेस बाहेर सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे साहजिकच कल्याण, कुर्ला, दादर या ठिकाणच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. याशिवाय कल्याण, डोंबिवली, अलिबाग, उरण, कर्जत, श्रीवर्धन, पेण, मुरूड या आगारातील बसेस इलेक्शन ड्युटीला गेल्याने पनवेल मार्गावरील फेऱ्यांची संख्या घटली आहे.