शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

ई-कचऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 1, 2016 02:43 IST

शहरांमधील घनकचरा व्यवस्थापन करण्यास अपयशी ठरलेल्या शासकीय यंत्रणा ई कचऱ्याच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. ई - कचरा व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणाच नाही.

- नामदेव मोरे,  नवी मुंबईशहरांमधील घनकचरा व्यवस्थापन करण्यास अपयशी ठरलेल्या शासकीय यंत्रणा ई कचऱ्याच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. ई - कचरा व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणाच नाही. शास्त्रीय पध्दतीने या कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होवू लागले आहेत.मुंबईमधील देवणार डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीनंतर शहरांमधील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरामधील ओला - सुका कचरा संकलित करणे व त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणारी यंत्रणा निर्माण करण्यात मुंबईसह ठाणे जिल्ह्यामधील महाराष्ट्रामध्ये व नगरपालिकांनाही शक्य झालेले नाही. कचरा टाकण्यासाठी डंपींग ग्राऊंड होत नाही सर्वसाधारण कचऱ्याच्या प्रश्न अद्याप सुटलेला नसताना ई - कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नवे आव्हाण शासकीय यंत्रणांसमोर उभे राहिले आहे. शहरांसह ग्रामीण भागातली टी. व्ही., रेडीओ, मोबाईल, लँडलाईन फोन, फ्रीज, मिक्सर, संगणक, लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर झपाट्याने वाढत आहे. एकट्या बेंगलोर शहरामधून प्रत्येक वर्षी ७ ते ८ हजार टन ई कचरा तयार होत आहे. मुंबई - ठाणे परिसरामध्येही प्रत्येक वर्षी हजारो टन ई - कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने घनकचऱ्यामध्येच ई - कचराही टाकला जात आहे.प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये ई - कचरा निर्माण होत आहे. नवीन मोबाईल घेतला की जुना कचराकुंडीत टाकला जातो. संगणकापासून इतर अनेक वस्तू भंगार वाल्याला विकल्या जातात.हा सर्व कचरा अखेर डंपींग ग्राऊंड व शहरांमधील मोकळ्या भूखंडावर टाकला जात असून त्याचे पर्यावरणावर गंभीर परिणाम होवू लागले आहेत.परिणाम होण्याची शक्यता असते. आरोग्यावर गंभीर परिणाम : ई - कचऱ्यामधील धातू वेगळा करताना ते अ‍ॅसीड टाकून जाळले जातात. कचऱ्यामध्ेय ई - वस्तू टाकल्याने घातक रसायणे पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात मिसळतात. यामुळे मज्जा संस्था, पुनउत्पादन किडनी, फुफ्फुसे, त्वचा व मेंदूशी संबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता असते. घातक रसायणांचा समावेशइलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती करण्यासाठी आर्सेनिक, लिथियम, अ‍ॅटिमनी, शिसे, पारा, कॅडमियन व इतर धातूंचा वापर केला जातो. पॉलीक्लोरिनेटेड, डायफेनाईल्स, पॉलिकोमिनेटेड बायफेनाईल्स, क्लोरो फ्ल्युरोकार्बन यांचा वापर केला जातो. अनेक ठिकाणी ई - कचऱ्याचा पुनर्वापर करताना सुट्टे भाग तोडून फोडून सुट्टे भाग वेगळे केले जातात. त्यावर अ‍ॅसिड टाकून तांबे अ‍ॅल्युमिनीयम, चांदी व क्वचित प्रमाणात सोने वेगळे केले जाते.