शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये लवकरच धावणार ई-रिक्षा ?

By admin | Updated: February 17, 2016 02:19 IST

येथील ब्रिटिशकालीन हातरिक्षा माणसाने माणसाला ओढून न्यायचे साधन आजमितीपर्यंत सुरू असून ही अमानवीय प्रथा बंद व्हावी, यासाठी मागील तीन वर्षांपासून येथील

माथेरान : येथील ब्रिटिशकालीन हातरिक्षा माणसाने माणसाला ओढून न्यायचे साधन आजमितीपर्यंत सुरू असून ही अमानवीय प्रथा बंद व्हावी, यासाठी मागील तीन वर्षांपासून येथील प्राध्यापक सुनील शिंदे हे शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. येथे पर्यावरणपूरक बॉटरी (ई -रिक्षा) रिक्षा सुरू होण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे येथे ई-रिक्षा सुरू होणार असल्याचे संकेत प्राप्त होत असल्याने श्रमिक हातरिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. ई-रिक्षा सुरू करण्यासाठीचा प्रारूप आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोकण विभागाचे आयुक्त यांच्याकडे महसूल शाखेने दिलेली आहे. माथेरानच्या हातरिक्षा ओढणाऱ्या श्रमिकांना या अमानवीय प्रथेतून मुक्ती देण्याच्या हेतूने शासनाने पाऊल उचलले आहे. महसूल खात्याने १९५९ मध्ये माथेरान नियमावलीची अधिसूचना जारी केली होती. नियम ४३ अन्वये येथे मोटार वाहनास बंदी घालण्यात आली असून, वाहतुकीसाठी घोडा व माणसाने ओढावयाच्या हातरिक्षाला परवानगी आहे. ही दोन्ही वाहने मध्यमयुगीन आहेत. यासाठी पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्याची मागणी श्रमिक रिक्षा संघटना सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन वर्षांपासून सातत्याने करीत आहे. एकूण ९४ रिक्षा परवानाधारक आहेत. ई-रिक्षा सुरू झाल्यासच श्रमिकांना या अमानुष प्रथेतून मुक्ती मिळणार आहे, असे संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, प्रकाश सुतार, संतोष शिंदे, अनिल नाईकडे यांनी सांगितले.