शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

टेकडीवरील उद्यानाकडे महापालिकेचे दुर्र्लक्ष

By admin | Updated: November 15, 2015 00:14 IST

संत गाडगेबाबा यांच्या आठवणी जपण्यासाठी महापालिकेने आयुक्त निवासाच्या टेकडीवर उद्यान विकसित केले आहे.

नवी मुंबई : संत गाडगेबाबा यांच्या आठवणी जपण्यासाठी महापालिकेने आयुक्त निवासाच्या टेकडीवर उद्यान विकसित केले आहे. फक्त ५ व २ रुपये तिकीट असल्यामुळे नियमित येथे गर्दी असते. पाच वर्षांत तब्बल ९ लाख नागरिकांनी उद्यानास भेट दिली आहे. पालिका प्रशासन मात्र उद्यानाच्या देखभालीकडे योग्य लक्ष देत नसून येथे येणाऱ्या नागरिकांना अत्यावश्यक सुविधाही मिळत नाहीत. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात जवळपास २०० उद्याने विकसित केली आहेत. प्रत्येक नोडमध्ये नागरिकांना चांगले उद्यान उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु उद्यानांचा विकास करतानाही पक्षपात होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. उच्चभ्रू नागरिकांची वस्ती असलेल्या परिसरात उद्यानांवर जास्त खर्च होत असून गरिबांच्या वसाहतीमधील उद्यानांकडे मात्र दुर्लक्ष होऊ लागले आहे. महापालिकेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर मिळालेल्या पैशातून हे उद्यान विकसित केले आहे. ११ जानेवारी २०११ ला हे उद्यान सुरू करण्यात आले. शहरात प्रथमच उद्यानामध्ये प्रवेश करण्यासाठी तिकीट दर आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रौढ नागरिकांसाठी ५ रुपये व १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी २ रुपये तिकीट ठेवण्यात आले. परंतु शहरात पहिलेच भव्य उद्यान असल्यामुळे व रेल्वे स्टेशनवरून पाच मिनिटा७त पोहोचता येत असल्यामुळे नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळू लागला. लहान मुले सुटी असली की पालकांना उद्यानाला भेट देण्याचा आग्रह करू लागली होती. नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाही पालिका प्रशासनाने उद्यानाच्या देखभालीकडे योग्य लक्ष दिले नाही. नोव्हेंबरपर्यंत टॉय ट्रेन बंदच होती. गत आठवड्यात सुरू केली आहे. राशी उद्यानामध्ये नागरिकांच्या माहितीसाठीचा फलकावरील मजकूर पुसला गेला आहे. सुरुवातीला बसविण्यात आलेल्या खेळण्यांमध्ये वाढ केलेली नाही. वंडर्स पार्कमध्ये ज्या पद्धतीने खेळण्यांच्या खाली रबराचे आवरण तयार केले आहे, त्यापद्धतीने या परिसरात काहीच उपाययोजना केल्या नाहीत. अ‍ॅम्पी थिएटर तयार केले आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग केला जात नाही. धबधबे बंद आहेत. हिरवळ मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्याचा योग्य उपयोग केला जात नाही. नागरिकांना घसरगुंडी व झोपाळ्याव्यतिरिक्त करमणुकीसाठी काहीच पर्याय नाही. तेवढी खेळणी तर प्रत्येक नोडमधील उद्यानांमध्येही बसविली आहेत. पाच वर्र्षांमध्ये महापालिकेने उद्यानामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. परंतु त्याकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी उद्यानाची दुरवस्था होऊ लागली असून पूर्वीपेक्षा भेट देणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे.