शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

देखभाल-दुरुस्तीअभावी सिडको वसाहतींतील उद्यानांची झाली दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 23:28 IST

दिवे, हायमास्ट बंद : गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव; सुविधा नसल्याने विरंगुळा केंद्र बंदावस्थेत; खेळणी मोडकळीस आल्याने अपघातांचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : सिडको वसाहतीत तयार करण्यात आलेल्या उद्यानांची सध्या दुरवस्था झाली आहे. महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर सिडकोने देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे परिसरातील रहिवाशांची गैरसोय होत आहे.

नवीन पनवेल, कळंबोली वसाहत सिडकोने अनेक वर्षांपूर्वी निर्माण केल्या. त्या वेळी उद्यानांसाठी भूखंड आरक्षित ठेवण्यात आले होते. कालांतराने या ठिकाणी उद्याने विकसित करण्यात आली. सुरुवातीला यासाठी फक्त सिडकोची घरे असल्याने लोकसंख्या कमी होती. मात्र, आता मोठमोठे गृहप्रकल्प आल्याने लोकसंख्या कमालीची वाढली. तुलनेने उद्यान संख्या अपुरी आहे.

खारघरमध्येही सिडकोकडून उद्यान निर्माण करण्यात आली आहेत. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी त्यांची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी संरक्षण भिंती तुटलेल्या आहेत. काही उद्यानाला प्रवेशद्वार नाही, तर काही ठिकाणी उद्यानातील दिवे, हायमास्ट बंद अवस्थेत आहेत. जॉगिंग ट्रॅकही खराब झालेले आहेत.पावसाळा संपल्यानंतरही येथील गवत छाटणी होणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. येथील झाडांचीही व्यवस्थित देखभाल केली जात नाही. कित्येक ठिकाणी लहान मुलांची खेळणी मोडली आहेत.

सिडकोने काही उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधली आहेत. त्या ठिकाणीसुद्धा सुविधांचा अभाव दिसून येत आहे. काही केंद्र बंद अवस्थेत आहेत. कामोठे कॉलनीत उद्यानाकरिता राखीव असलेलाभूखंड अद्याप विकसित करण्यात आलेला नाही. या ठिकाणी डेब्रिज, कचरा टाकला जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. परिसरातील उद्यानांचे सुशोभीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.नवीन पनवेल येथे उद्यानांची अवस्था बिकटनवीन पनवेल, सेक्टर १२, १५ आणि १६ येथे सिडकोने अगोदर उद्यान विकसित केली आहेत. मात्र, देखभालीकडे लक्ष दिले नाही. याच कारणाने अनेक गोष्टींचा अभाव येथे दिसून येत आहे. महापालिका स्थापन झाल्यानंतर याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.सिडकोने सुरुवातीला उद्यान विकसित केले. अल्ट्रा मॉडर्न गार्डन म्हणून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाला; परंतु ते मेंटेन ठेवण्याकरिता दुर्लक्ष झाले, हीच वस्तुस्थिती आहे. महापालिका स्थापन झाल्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अनेक उद्यानांची दुरवस्था झाली. त्यांची दुरुस्ती करावी यासाठी सिडकोकडे पाठपुरावा सुरू आहे.- संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष, पनवेल

सिडको वसाहतीतील उद्यानाची हस्तांतर प्रक्रिया सुरू आहे. उद्यानाचे काही प्लॉट हस्तांतर करण्यात आले आहेत. महापालिकेला सद्यपरिस्थितीत असलेले उद्यान हस्तांतरित करण्यात येणार आहे. काही उद्यानातील दुरवस्था झाली आहे. त्यांचे काम चालू आहे, तसेच उद्यानासाठी लागणाऱ्या सुविधाही पुरवण्यात येत आहेत.- सीताराम रोकडे, अधीक्षक, अभियंता सिडको