शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणेतील होल्डिंग पॉण्डवर डेब्रिजचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2015 01:03 IST

कोपरखैरणेतील होल्डिंग पॉण्डच्या परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. काही भागात तर चक्क खारफुटीवर

नवी मुंबई: कोपरखैरणेतील होल्डिंग पॉण्डच्या परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. काही भागात तर चक्क खारफुटीवर डेब्रिजचे ढीग पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा डेब्रिज माफियांनी तोंड वर काढल्याचे दिसून आले आहे. वाशी-कोपरखैरणे मार्गावरील कलश उद्यान सोसायटीच्या समोरील बाजूला विस्तीर्ण होल्डिंग पॉण्ड आहे. मागील अनेक वर्षांत या पॉण्डची साफसफाई न झाल्याने त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. खारफुटीची बेसुमार वाढ झाली आहे. आतील गाळ उपसण्यासठी काही प्रमाणात खारफुटीची तोड करावी लागणार आहे. मात्र त्यासाठी पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळत नसल्याने पॉण्डची दुरवस्था झाली आहे. महापालिकेने सुरक्षेच्या कारणास्तव पॉण्डच्या दोन्ही प्रवेशद्वारावर लोखंडी फाटक लावले आहे. मध्यंतरी या ठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात होते. मात्र आता हे सुरक्षा रक्षक दिसेनासे झाले आहेत. प्रवेशद्वाराचे गेटही सदैव उघडेच असते. त्यामुळे डेब्रिज माफियांचे फावले आहे. सर्रासपणे येथे डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्या जात आहेत. त्यामुळे खारफुटीची नासाडी होत आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाकडून या प्रकाराकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.