शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सगळ्या आव्हानांसाठी नौदल सज्ज - गिरीश लुथ्रा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 06:28 IST

कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता नौदलात आहे. परिणामी, आदेश मिळाल्यास कोणत्याही क्षणी सगळ्या आव्हानांसाठी नौदल सज्ज असल्याचा विश्वास, नौदलाच्या पश्चिम विभागाचे व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी व्यक्त केला.

मुंबई : कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता नौदलात आहे. परिणामी, आदेश मिळाल्यास कोणत्याही क्षणी सगळ्या आव्हानांसाठी नौदल सज्ज असल्याचा विश्वास, नौदलाच्या पश्चिम विभागाचे व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी व्यक्त केला. देशाच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मेरीटाइम बोर्ड आणि भारतीय नौदलातील अधिकारी यांच्या संवाद कार्यक्रमात, लुथ्रा शुक्रवारी कफ परेड येथे बोलत होते.आयएमसी चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री व आयएमसी महिला विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी नेव्हल वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन (नावा) पश्चिम विभागाच्या अध्यक्षा प्रीती लुथ्रा, आयएमसी महिला विभागाच्या अध्यक्षा नयनतारा जैन, आयएमसी चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. ललित कनोडिया उपस्थित होते. देशाच्या सागरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ‘शॉर्ट टर्म’ आणि ‘लाँग टंर्म’ योजना तयार केलेली आहे. देशातील सागरी किनाºयावरील सद्य आणि संभाव्य धोका लक्षात घेत, या योजना तयार करण्यात आल्या आहेत. नौदलाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी सरकारने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर, सागरमाला प्रकल्प, सायबर हल्ला, देशांतर्गत होणारे सागरी सराव अशा विविध विषयांसंबंधी लुथ्रा यांनी माहिती दिली.देशभर कार्यरत असलेल्या नेव्हल वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन (नावा) तर्फे राबविलेल्या विविध योजनांची माहिती पश्चिम विभागीय अध्यक्षा प्रीती लुथ्रा यांनी दिली. आयएमसी महिला विभागाच्या अध्यक्षा नयनतारा जैन म्हणाल्या की, ‘महिला विभाग देशाचे संरक्षण अबाधित राखण्यासाठी तत्पर असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी कार्यरत आहे. देशाच्या संरक्षणासाठी महिलांप्रमाणे धैर्याने राहा, स्वत: विश्वास ठेवा, देश आणि समाजाला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी त्याग करा,’ असेही त्यांनी सांगितले.‘वूमन इन व्हाइट’चा सन्मान : नौदलात महिला सर्व जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करत आहेत. नौदलातील आयएनएस शिक्रावरील स्टाफ आॅफिसर लेफ्टनंट मीनाक्षी पांडेचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. नौदलाच्या पश्चिम विभागाचे व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा आणि ‘नावा’च्या पश्चिम विभागीय अध्यक्षा प्रीती लुथ्रा यांच्या हस्ते मीनाक्षी यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी मीनाक्षीने नौदलातील तिच्या अनुभवांना उजाळा दिला.