शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग नाट्यगृहाचे स्वप्न धुळीला

By admin | Updated: March 8, 2016 02:01 IST

नाट्यगृहासाठी अलिबागच्या नगर पालिकेकडे जागा उपलब्ध नाही, तसेच नाट्यगृहासाठी सरकारकडून प्राप्त होणारा सुमारे चार कोटी रुपयांचा निधी पदरात पाडून घेण्यासाठीही पालिकेकडे २० लाख रुपये नाहीत

अलिबाग : नाट्यगृहासाठी अलिबागच्या नगर पालिकेकडे जागा उपलब्ध नाही, तसेच नाट्यगृहासाठी सरकारकडून प्राप्त होणारा सुमारे चार कोटी रुपयांचा निधी पदरात पाडून घेण्यासाठीही पालिकेकडे २० लाख रुपये नाहीत. त्यामुळे अलिबागकरांचे नाट्यगृहाचे स्वप्न आता पुरते धुळीला मिळाल्याची माहिती अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी दिली.अलिबाग हे जिल्ह्याच्या राजधानीचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी सुसज्ज नाट्यगृह असावे अशी प्रत्येक अलिबागकरांची इच्छा आहे. आज ना उद्या नाट्यगृह पालिकेमार्फत उभे राहील अशी भाबडी आशा अलिबागकरांना होती. अलिबागच्या नाट्यगृहासाठी नगर पालिकेने विकास आराखड्यामध्ये कोणतेच आरक्षण ठेवलेले नसल्याची धक्कादायक बाब मधुकर ठाकूर यांनी उघडकीस आणली आहे.१ जून २०१५ च्या अलिबाग नगर पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्रमांक ६२३ नुसार नाट्यगृहासाठी जागा नाही. तसेच २० लाख रुपयेही नगर पालिका उपलब्ध करु शकत नाही. नगर पालिका प्रकल्पात एकत्रित काम करु शकत नाही. पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ या नाट्यगृहाच्या बांधकामास अर्थसहाय्य देण्यासाठी ना हरकत दाखला द्यावा, असा ठराव घेण्यात आला आहे. याच सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्रमांक ६२१ नुसार अलिबाग नगर पालिकेच्या मालकीची सुमारे १२ गुंठे जागा स.नं.७/२, सी.स.नं.१३२४ ही जागा वाणिज्य कारणासाठी अलिबागच्या श्रीबाग सहकारी मध्यवर्ती ग्राहक मंडळाला तीन वर्षे भुईभाड्याने देण्याला संमती दिली आहे, या दोन्ही ठरावांकडे ठाकूर यांनी लक्ष वेधले. नाट्यगृहासाठी जागा असताना ती सहकारी संस्थेला देण्याची गरज काय होती, असा प्रश्नही ठाकूर यांनी उपस्थित केला.