शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

मराठा मोर्चासाठी ‘तो’ मंडप काढा

By admin | Updated: October 15, 2016 06:27 IST

येत्या रविवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचा मार्ग मोकळा राहण्यासाठी टेंभीनाका नवरात्रोत्सव मंडळास शुक्रवारपर्यंत मंडप खाली

ठाणे : येत्या रविवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचा मार्ग मोकळा राहण्यासाठी टेंभीनाका नवरात्रोत्सव मंडळास शुक्रवारपर्यंत मंडप खाली करण्याचे पत्र शहर पोलिसांनी धाडले आहे. त्यामुळे या ठिकाणी मंडप हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून रस्ता वेळीच मोकळा केला जाईल, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.टेंभीनाक्यावरील नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. ४० वर्षांपासून नवरात्रोत्सवात येथील रस्ता पूर्ण बंद केला जातो. येत्या रविवारी (१६ आॅक्टोबर) ठाण्यात मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा तीनहातनाका येथून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या वेळी साधारणत: तीन लाख नागरिक येतील, असे नियोजन आहे. त्यामुळे मोर्चासाठी रस्ता मोकळा मिळावा, यासाठी मंडप शुक्रवार, १४ आॅक्टोबरपर्यंत हलवण्याचे पत्र ठाणेनगर पोलिसांनी ९ आॅक्टोबरला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या पत्राची दखल घेऊन देवी विसर्जनानंतर मंडपाने व्यापलेला रस्ता तत्काळ मोकळा करण्यास सुरुवात झाली असून तो १५ आॅक्टोबरला वाहतुकीस खुला होईल, असे पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)