शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. सुधाकर शिंदे पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा रुजू होणार?

By admin | Updated: May 29, 2017 06:37 IST

पनवेल महानगरपालिका स्थापनेवेळी डॉ. सुधाकर शिंदे यांची आयुक्तपदी नेमणूक झाल्यानंतर संपूर्ण पालिकेचा चेहरामोहरा बदलला

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महानगरपालिका स्थापनेवेळी डॉ. सुधाकर शिंदे यांची आयुक्तपदी नेमणूक झाल्यानंतर संपूर्ण पालिकेचा चेहरामोहरा बदलला होता. त्यामुळे शिंदेंना पुन्हा पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी रु जू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांची उल्हासनगरला तडकाफडकी बदली करण्यात आली असताना निवडणुका संपताच पुन्हा शिंदे यांचा विषय चर्चेत आला आहे. येत्या ३१ तारखेला डॉ.सुधाकर शिंदे महानगरपालिकेत आयुक्त म्हणून पुन्हा रु जू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. भाजपाचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचे भाऊ असल्याने निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांची बदली झाल्याची जोरदार चर्चा सर्वत्र रंगली होती. निवडणुकीपूर्वी शिंदे यांच्या झालेल्या बदलीविरोधात रहिवासी, संघटनांनी पनवेलमध्ये रान उठविले होते. पनवेल महानगरपालिका संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी बदलीविरोधात मोर्चा देखील काढला होता. मात्र निवडणुकीनंतर शिंदे हे परत येतील, अशी माहिती राज्य शासनाने दिली होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी २६ रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून डॉ. सुधाकर शिंदे यांना पुन्हा पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे. डॉ. सुधाकर शिंदे हे पुन्हा पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त झाल्यास पालिकेचा कारभार पारदर्शक पार पडेल, अशी प्रतिक्रि या पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांनी दिली. डॉ. सुधाकर शिंदे यांच्या बदलीविरोधात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांची आम्ही भेट घेतली होती. त्यांची नियुक्ती पालिकेवर झाल्यास हे आमच्या आंदोलनाचे यश असल्याची प्रतिक्रि या पनवेल महानगर पालिका संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिली. मला याबाबत काहीच कल्पना नाही. शासन ज्या ठिकाणी मला पाठवेल त्याठिकाणी जाऊन प्रामाणिक काम करेल हेच माझे ध्येय आहे.- डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका