शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
8
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
9
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
10
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
11
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
12
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
13
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
14
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
15
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
16
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
17
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
18
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
19
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
20
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर म्हणजे क्रांतीचा ज्वालामुखी

By admin | Updated: May 6, 2015 23:24 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साक्षात क्रांतीचे धगधगते ज्वालामुखी होते. त्यांनी बहिष्कृत जीणे जगणाऱ्यांसाठी लढा उभारला.

नागोठणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साक्षात क्रांतीचे धगधगते ज्वालामुखी होते. त्यांनी बहिष्कृत जीणे जगणाऱ्यांसाठी लढा उभारला. या लढ्याच्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार जिल्ह्यातील आगरी समाजाचे नेते नारायण नागू पाटील यांनी केला. शेतकऱ्यांचा संप, खोतशाही नष्ट करण्यात डॉ. आंबेडकरांचे योगदान असून सालिंदे गावात आगरी आणि बौद्धबांधव गुण्यागोविंदाने राहत आहेत, हे त्याचेच प्रतीक असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. बुद्ध जयंतीचे औचित्य साधून आनंदराज आंबेडकर यांनी सालिंदे (कासू) येथील बुद्धविहारला भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आंबेडकर बोलत होते. डॉ. आंबेडकर आणि भगवान बुद्ध समतेचे प्रतीक आहेत. बुद्धांचे धम्म तत्त्वज्ञान आणि चांगुलपणाच्या नीतीने परिपूर्ण असा भरलेला आहे, म्हणूनच धम्म सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी असाच आहे. धम्माचा आरंभ, मध्य आणि शेवट कल्याणकारीच आहे. कल्याणाचा विचार जनसामान्यांना पोहोचविण्याचा संदेश आपल्याला भगवान बुद्ध यांनीच दिला असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती, मुंबईचे सरचिटणीस लक्ष्मण भगत, निवृत्त पोलीस अधिकारी प्रमोद काकडे, बौद्धजन समाज सेवा संघ, रायगडचे सचिव चंद्रकांत अडसुळे, पांडुरंग साळवी, दयानंद काकडे आदी मान्यवरांसह समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)