शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोकालीन बालवाडीच्या इमारतीची झाली धर्मशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:05 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी मार्केटजवळ सिडकोकालीन बालवाडीचे धर्मशाळेत रूपांतर झाले आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी मार्केटजवळ सिडकोकालीन बालवाडीचे धर्मशाळेत रूपांतर झाले आहे. या इमारतीमध्ये स्टॉल्सचालकाने व कँटीन चालविणाऱ्यांनी अतिक्रमण केले असून, गोडावनाप्रमाणे त्याचा वापर सुरू केला आहे. सिडको व महापालिका प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.भाजी मार्केट व विस्तारित भाजी मार्केच्या मध्ये सिडकोने बालवाडी सुरू करण्यासाठी इमारत बांधली होती. त्या ठिकाणी बालवाडीचे वर्ग सुरूही केले होते; पण अनेक वर्षांपासून या इमारतीचा काहीही वापर केला जात नाही. दोन वर्षांपासून या इमारतीमध्ये अतिक्रमण होऊ लागले आहे. पूर्वी भाजी मार्केटमधील खोके व इतर वस्तू या ठिकाणी ठेवल्या जात होत्या. मागील काही महिन्यांपासून येथील एक पानटपरीचालकाने या इमारतीमध्ये गोडाऊन सुरू केले आहे. पाण्याच्या बॉटल व इतर वस्तू ठेवल्या जात आहेत. याशिवाय येथे अनधिकृतपणे खानावळ सुरू केली आहे. खाद्यपदार्थ बनविले जात आहेत; पूर्ण इमारतीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. इमारतीचा वापर नक्की कोण करतो? याची कोणतीही माहिती महापालिका, सिडको व पोलीस प्रशासनाला नाही.बाजारसमितीमध्ये असलेली ही वास्तू महापालिकेने ताब्यात घेऊन तिचा योग्य वापर करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. बाजारसमिती प्रशासनानेही संबंधित आस्थापनांना याविषयी कळवावे, अशी मागणी भारतीय विद्यार्थी सेनेचे बेलापूर उप विधानसभा संघटक गणेश पावगे यांनी केली आहे. बाजारसमितीमधील व्यापारी व कामगारांनीही ही इमारत अतिक्रमणमुक्त करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याविषयी ठोस उपाययोजना केली नाही, तर या इमारतीमध्ये अवैध व्यवसाय सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.>सिडकोकालीन बालवाडीमध्ये घुसखोरी झाली आहे. ही इमारत सिडको किंवा महापालिकेने ताब्यात घेऊन तिचा योग्य उपयोग करावा.- गणेश पावगे,उपविधानसभा अध्यक्ष, भारतीय विद्यार्थी सेना