शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

‘सभा कशी चालवायची आम्हाला शिकवू नका’

By admin | Updated: October 15, 2016 06:54 IST

सभा कशी चालवायची ते आम्हाला शिकवू नका. माईक बंद करायचा की चालू ठेवायचा, आम्हाला सल्ले देवू नका. विषय पत्रिकेव्यतिरिक्त शहरवासीयांच्या समस्या

नवी मुंबई : सभा कशी चालवायची ते आम्हाला शिकवू नका. माईक बंद करायचा की चालू ठेवायचा, आम्हाला सल्ले देवू नका. विषय पत्रिकेव्यतिरिक्त शहरवासीयांच्या समस्या सभागृहात मांडता येत नाहीत हा शोध तुम्ही कोठून लावला आहे? जनतेचे प्रश्न मांडता येणार नसतील तर आम्ही काय खुर्चीत बसण्यासाठी आलो आहोत का, अशा शब्दात स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांनी उपआयुक्त सुहास शिंदे यांना खडसावले. स्थायी समिती बैठकीसाठी आयुक्त तुकाराम मुंढे व अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण नसल्यामुळे त्यांच्यावतीने उपआयुक्त सुहास शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली होती. सभापती शिवराम पाटील यांनी घणसोली हस्तांतरणाचे काय झाले? नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत असून प्रशासनाने याबाबत निवेदन करण्याच्या सूचना केल्या. शिंदे यांनी प्रथम विषय पत्रिकेवरील प्रस्तावांवर चर्चा करावी, त्या व्यतिरिक्त चर्चा करता येत नसल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या सभापतींनी प्रशासनास धारेवर धरले. ‘आम्ही १५ वर्षे सभागृहात व स्थायी समितीमध्येही आहोत. कोणत्या विषयावर चर्चा करायची ते मी ठरवेन. तुमच्या सल्ल्याने सभा चालविण्याची गरज वाटत नसल्याचे स्पष्ट केले. सभापतींचा पारा चढल्यामुळे शिंदे यांनी तुम्ही माईक बंद करून बोला असे सुचविले. वारंवार तुम्ही माईक बंद करा असे सांगितले जात असल्यामुळे मी काय करायचे याविषयी तुम्ही सल्ला देण्याची गरज नसल्याचे सांगितले. प्रशासनाच्यावतीने शिंदे यांनी घणसोली हस्तांतरणाविषयी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंत्रालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे सांगितले. मात्र प्रशासनाच्या भूमिकेविषयी इतर सदस्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)