शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांअभावी घणसोलीकरांचा सिडकोविरोधात असंतोष

By admin | Updated: February 15, 2016 03:09 IST

घणसोली कॉलनी परिसर अद्यापही महापालिकेला हस्तांतर झालेला नसल्याने तिथल्या रहिवाशांना विविध गैरसोयींना सामोर जावे लागत आहे.

नवी मुंबई : घणसोली कॉलनी परिसर अद्यापही महापालिकेला हस्तांतर झालेला नसल्याने तिथल्या रहिवाशांना विविध गैरसोयींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे त्रस्त असलेल्या रहिवाशांनी जनसंवाद उपक्रमादरम्यान तक्रारींच्या माध्यमातून आपला असंतोष व्यक्त केला. यावेळी वीज वितरण व रस्त्यांबाबतच्या तक्रारींची संख्या अधिक होती.सिडकोने घणसोली कॉलनी विभाग अद्याप महापालिकेला हस्तांतर केलेला नाही. नव्याने विकसित होत असलेल्या या विभागातील रहिवाशांकडून सुविधांच्या नावाखाली कर घेतला जात असताना पुरेशा सुविधा मात्र मिळत नाहीत. परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली असल्याने अवघ्या १० वर्षांतच तिथले रस्ते रहदारीला अपुरे पडत आहेत. रहदारी वाढलेली असताना दुतर्फा होणारी पार्किंग तिथली मोठी समस्या ठरत आहे. तर पदपथांवर बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या दमदाटीला पादचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. विभागात रस्ते आहेत मात्र महानगर गॅस, विद्युत विभाग यांच्याकडून वारंवार खोदकामे होत आहेत. त्यानंतर रस्ते बुजवताना समानता व दर्जा राखला जात नसल्याने पडलेले खड्डे चुकवत चालकांना वाहने चालवावी लागत आहेत. तर सेक्टर १५-१६ परिसरात लोकवस्ती वाढलेली असतानाही अद्याप त्या ठिकाणी चांगल्या रस्त्यांची निर्मिती झालेली नाही. याचा परिवहन सेवेवरही परिणाम होत आहे. या भेडसावणाऱ्या समस्या सोडवणार तरी कोण, असा प्रश्नही रहिवाशांना सतावत आहे. सिडको व महापालिकेच्या हस्तांतर निर्णयात होणाऱ्या विलंबामुळे विभागातील सुविधा रखडल्या आहेत.सेक्टर १ व ७ परिसरात असलेल्या दोन नाल्यांमधून वाहणाऱ्या दूषित पाण्यापासून पसरणारी दुर्गंधी त्रासदायक ठरत आहे. शिवाय त्या ठिकाणच्या डासांमुळे नागरी आरोग्याचाही गंभीर प्रश्न सतावत आहे. खेळाची मैदाने, विरंगुळ्यासाठी उद्याने नसल्याने लहान मुलांसह ज्येष्ठांचीही गैरसोय होत आहे. नागरिकांच्या या विविध समस्या जाणून त्यावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने आमदार संदीप नाईक यांनी जनसंवादाचे आयोजन केले होते. त्यामध्ये नागरिकांनी होणाऱ्या गैरसोयी मांडत सिडकोविरोधातला असंतोष व्यक्त केला. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह सिडको, पालिका, वीज वितरण, पोलीस यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी सिडकोच्या विरोधातील होत्या. त्या निकाली काढण्याचे आश्वासन आमदार नाईक यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)