शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १६ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

By admin | Updated: October 10, 2016 03:47 IST

आयुक्तांनी नगरसेवक पद रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीच्या दिघा येथील तीन नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतली आहे

नवी मुंबई : आयुक्तांनी नगरसेवक पद रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीच्या दिघा येथील तीन नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी याविषयी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने आयुक्तांना अधिकार असल्याचा निर्णय दिल्यास एकूण १६ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे. दिघा येथील अनधिकृत बांधकामप्रकरणी राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते व दीपा राजेश गवते यांचे नगरसेवकपद आयुक्तांनी रद्द केले होते. या निर्णयाला गवते कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आयुक्तांना अपात्र ठरविण्याचे अधिकार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. न्यायालयाने आयुक्तांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती. सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयुक्तांना अपात्रतेचे अधिकार असल्याचा निर्णय झाल्यास भविष्यात अनेक नगरसेवकांचे पद धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईमधील शिवसेनेच्या ९, भाजपाच्या २ व राष्ट्रवादी काँगे्रसच्या ५ नगरसेवकांविरोधात अतिक्रमण प्रकरणी तक्रारी करण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ नगरसेवकांचे पद रद्द करावे यासाठी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. याविषयी २१ आॅक्टोबरला सुनावणी होणार असून दोन्ही नगरसेवकांना त्यांचे लेखी अथवा तोंडी म्हणणे मांडण्यासाठीचे पत्र देण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अतिक्रमणाचा फटका कोणत्या राजकीय पक्षाला किती बसणार, नगरसेवकांचे पद जाणार का याविषयी चर्चा शहरात सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)