शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचावर कारवाई करताना भेदभाव

By admin | Updated: February 15, 2016 03:04 IST

मुंबई ग्रामंपचायत कायद्याच्या कलम ३९ (१) अन्वये सरपंच, उपसरपंच व सदस्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकणे, त्यांना अपात्र ठरविणे याबाबत कारवाई करताना

अलिबाग : मुंबई ग्रामंपचायत कायद्याच्या कलम ३९ (१) अन्वये सरपंच, उपसरपंच व सदस्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकणे, त्यांना अपात्र ठरविणे याबाबत कारवाई करताना आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून राजकीय दडपणाखाली भेदभाव केला जात असल्याची गंभीर तक्र ार काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कोकण विभाग आयुक्त, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संशयास्पद कार्यपध्दतीबाबत त्यांची चैकशी करण्याची मागणीही ठाकूर यांनी केली आहे. या पत्राच्या प्रती मुख्य सचिव, प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, आयुक्त कोकण विभाग व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आल्याचे ठाकूर म्हणाले.ठाकूर यांनी २०१३ मधील मुंबई ग्रामंपचायत कायद्याच्या कलम ३९ (१) नुसार अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायत आणि २०१५ मधील थळ ग्रामपंचायत यांच्या बेकायदा वर्तनाबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यावर अद्याप कारवाई नाही. त्यानंतर सुमारे तीन वर्षांनंतर प्राप्त झालेल्या तक्र ारीमध्ये आयुक्तांनी तातडीने निर्णय घेऊन संबंधित सरपंचांना पदावरून दूर केले असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. पदाचा गैरवापर करणाऱ्या सरपंचांविरुद्ध आयुक्तांनी पारित केलेले आदेश योग्य असले तरी ते पारित करताना आयुक्तांवर राजकीय दडपण असल्याचा संशय ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. अलिबाग शहरानजीक असलेल्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीमधील जागा आरसीएफ कंपनीच्या मालकीची असूनही ही जागा आरसीएफची नसल्याचे लेखी निवेदन देऊन या जागेमधील अतिक्र मणास पाठिंबा देणाऱ्या चेंढरे ग्रामपंचायतीच्या १४ ग्रामपंचायत सदस्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्र ठरविण्याबाबत ठाकूर यांनी २५ मार्च २०१३ ला आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे तक्र ार दाखल केली होती. तसेच अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरीस-गुंजीसच्या कार्यक्षेत्रामध्ये गट ग्रामपंचायत थळ यांनी बेकायदा बांधकामे परवानग्या दिल्या असल्याबाबत ठाकूर यांनी आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे २ मार्च २०१५ समक्ष तक्र ार दाखल केली होती. (प्रतिनिधी)