शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नवी मुंबईतील कर्तव्यदक्ष पोलिसांचा सन्मान सोहळा

By admin | Updated: March 30, 2017 07:06 IST

कायदा सुव्यवस्था सांभाळण्याबरोबर गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अविरत परिश्रम करणाऱ्या पोलीस अधिकारी

नवी मुंबई : कायदा सुव्यवस्था सांभाळण्याबरोबर गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अविरत परिश्रम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान ‘लोकमत’च्यावतीने करण्यात येत आहे. ३१ मार्चला वाशीमध्ये कर्तृत्ववान अधिकारी व कर्मचाऱ्यांना आऊटस्टँडिंग पोलीस अ‍ॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना १९९४ मध्ये झाली. महापालिकेसह, पनवेल, उरणमधील तब्बल ९५३ चौरस किलोमीटर परिसराची जबाबदारी आयुक्तालयावर आली. जेएनपीटी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर, ठाणे बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहत, ओएनजीसी, एचपीसीएल, आयपीसीएल, बीपीसीएल, दीपक फर्टिलायझर्स, घारापुरी लेणी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, ऐरोली ते उरण, पनवेलपर्यंतचा खाडीकिनारा, ऐरोली पॉवर हाऊससह अनेक महत्त्वाचे प्रकल्प या परिसरामध्ये आहेत. मुंबईनंतर राज्यातील सर्वात महत्त्वाचा परिसर म्हणून नवी मुंबईची ओळख निर्माण झाली असून, येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कायम राखण्यासाठी व गुन्हेगारी नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पहिले आयुक्त के. एस. शिंदे ते विद्यमान आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी अविश्रांत मेहनत घेत आहेत. या परिश्रमामुळेच राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे सर्वात चांगले प्रमाण नवी मुंबई आयुक्तालयाचे आहे. राज्यातील सर्वात चांगले काम करणाऱ्या नवी मुंबई आयुक्तालयातील कर्तृत्ववान अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ‘लोकमत’च्यावतीने पुरस्कार देवून गौरव केला जाणार आहे. ३१ मार्चला वाशीमधील रघुलीला मॉलमधील इंपेरियल बँक्वेट हॉलमध्ये सायंकाळी ६.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्पोटर््स अ‍ॅकॅडमी या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असणार आहेत. याशिवाय अरिहंत सुपर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, रोनक अ‍ॅडर्व्हटायझिंग, इंपेरियल बँक्वेट, बिझायर हेही कार्यक्रमाचा भाग असणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलिसांच्या कार्याचा सन्मान व्हावा व त्यांच्या कर्तृत्वापासून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित केला असून, यामध्ये वैयक्तिकसह सामूहिकपणे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)कर्तृत्वाचा सन्मान लोकमत आऊटस्टँडिंग पोलीस अ‍ॅवॉर्डसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी माजी आयुक्त व निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी निवड समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिले. महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास ते वाहतूक, सायबर, अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे.