शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जात पडताळणीत अडचणी

By admin | Updated: August 20, 2015 00:01 IST

रायगड जिल्ह्यात अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्राप्त करीत असताना अनेक अडचणी येतात. अनेकदा प्रमाणपत्र अवैध

अलिबाग : रायगड जिल्ह्यात अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्राप्त करीत असताना अनेक अडचणी येतात. अनेकदा प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे अनेकांना नोकरीमधून कमी करण्यात आल्याची गंभीर समस्या कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख आ. रु पेश म्हात्रे व समिती सदस्यांसमोर मांडली.अनुसूचित जमातींच्या विविध समस्या आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी विधिमंडळाने १५ सदस्यांची एक समिती गठीत केली आहे. या समितीचा तीन दिवसीय दौरा बुधवारपासून सुरु झाला आहे.१९५० पूर्वीचा जातीच्या नोंदीचा पुरावा मागून अनेकांना जातीच्या दाखल्यापासून वंचित ठेवले जाते. १९५० पूर्वी आदिवासी लोक शिक्षित नसल्याने त्यांच्या जातीच्या नोंदी नाहीत. तर काहींची शालेय नोंद जन्म-मृत्यू रजिस्टर दस्त पुरावेमध्ये जातीच्या रकान्यात ‘कोळी’ अशी नोंद आढळते. नेमक्या जातीची नोंद नसल्याचे महासंघाच्या शिष्टमंडळाने समिती सदस्यांच्या लक्षात आणून दिले.१९७६ पूर्वीच्या आदिवासी क्षेत्रातील व विस्तारित आदिवासी क्षेत्रासाठी वेगवेगळी न्यायसमिती असून आजही क्षेत्रबंधन लावून कायद्याची पायमल्ली होत आहे. १०० ते १५० वर्षांपूर्वीच्या चालीरीती, लग्न, जन्म, मृत्यू, सणवार, धार्मिक विधी माहीत नाही म्हणून दाखला अवैध ठरविले जातात. जातीचा दाखला कार्यकारी दंडाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी असलेले सक्षम अधिकारी यांच्या सखोल चौकशी व कागदपत्रांच्या छाननीनंतर दिला जातो. हे प्रमाणपत्र नाकारणे हे योग्य ठरत नाही. यामुळेच उच्च व सर्वोच्च न्यायालयात खटले जास्त दिसतात. केवळ महाराष्ट्र राज्यात जात पडताळणी समिती आहे. त्यामुळे सर्व मागासवर्गीयांवर आर्थिक, मानसिक, शारीरिक अन्याय होत असल्याचे शिष्टमंडळाने नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)