शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

गावांचा विकास आव्हानात्मक

By admin | Updated: May 6, 2017 06:26 IST

नवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेली बहुतांशी गावे प्रभाग क्र मांक १ ते ३ मध्ये आहेत. भविष्यात या भागाचा

अरूणकुमार मेहत्रे/  लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेली बहुतांशी गावे प्रभाग क्र मांक १ ते ३ मध्ये आहेत. भविष्यात या भागाचा विकास करण्याचे मोठे आव्हान महानगरपालिकेसमोर असणार आहे. पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:सारण, रस्ते, गटारे या सुविधा पुरविण्याकरिता प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. याठिकाणी अ, आ, ईपासून सुरूवात करावी लागणार आहे. सिडकोने येथील जमीन संपादित करताना गावठाणांचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्राधिकरणाने सातत्याने दुर्लक्ष केले. या कारणाने वसाहती जरी झकास झाल्या असल्या तरी गावे मात्र भकासच राहिले आहेत. पनवेल महानगरपालिकेत २९ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यापैकी बरेचशी गावे प्रभाग १ ते ३ मध्ये येतात. त्या गावांपर्यंत नागरीकरण सुध्दा आले आहे तसेच टोलेजंग इमारती उभा राहिल्या आहेत. असे असले तरी पायाभूत सुविधांची मोठी वानवा आहे. दळवळणाकरिता रस्ते उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर पावसाळी पाणी वाहून नेण्याकरिता येथे गटारे नाहीत. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता मलनि:सारण केंद्रे नाहीत की घनकचरा उचलला जात नाही. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था नाही. अनेक ग्रामपंचायती हा कचरा महामार्गालगत किंवा नदीच्या पात्रात डम्प करीत होत्या आणि महापालिका झाल्यानंतरही बदललेली नाही. जी गावे समाविष्ट करण्यात आली आहेत त्यांचा विकास आराखडा तयार करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्या व्यतिरिक्त या भागात रस्त्यांची निर्मिती करणे सुध्दा अतिशय अवघड याचे कारण म्हणजे मनाला वाटेल त्या ठिकाणी इमारती, घरे उभारण्यात आलेले आहे. गावागावांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या निर्मितीत अडचणी येणार आहे. घनकचरा उचलण्याकरिता वेगळी यंत्रणा उभारावी लागेल त्याशिवाय त्याची विल्हेवाट लावायची कुठे आणि कशी याबाबत नियोजन करावे लागणार आहे. महापालिका हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये मलनि:सारण केंदे्र उभारावी लागतील त्याकरिता जागेची उपलब्धता करावी लागणार आहे.अनिधकृत बांधकामे जास्तबिनशेती परवाना त्याचबरोबर टाऊन प्लॅनिंगची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीची घरबांधणी परवाना घेवून टोलेजंग इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. हे बांधकाम करताना एफएसआय त्याचबरोबर रस्ते, सांडपाणी याचा विचार करण्यात आलेला नाही.तीनही प्रभागांना प्रदूषणाचा विळखातळोजा एमआयडीसीच्या बाजूला असलेल्या या तीनही प्रभागाला प्रदूषणाचा विळखा आहे. कारखाने मोठ्या प्रमाणात हवेत विषारी वायू सोडत आहेत. त्याचबरोबर रसायनमिश्रित सांडपाणी कासाडी नदीत सोडले जात आहे. प्रभाग क्र मांक-१च्या हद्दीत सिडकोचे डम्पिग ग्राउंड आहे. त्या ठिकाणी शास्त्रशुध्द पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट होत नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी कचरा डम्प करू दिला जात नाही.