शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

नैना क्षेत्रातील उर्वरित गावांसाठी विकास आराखडा

By admin | Updated: November 11, 2016 03:20 IST

नैना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याचा विकास आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत असतानाच सिडकोने तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचा विकास आराखडा तयार करून त्यावर

नवी मुंबई : नैना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याचा विकास आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत असतानाच सिडकोने तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचा विकास आराखडा तयार करून त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविल्या आहेत. या टप्प्यात नैना क्षेत्रातील २0१ गावांचा समावेश आहे. एमआयडीसी आणि रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग झालेली गावे यातून वगळण्यात आली आहेत.नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील २७० गावांतील सुमारे ६०० चौरस किलोमीटर क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने सिडकोवर जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार सिडकोने नैना प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्यामाध्यमातून नैना प्रकल्पाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना सिडकोने आखली आहे. पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. याचा प्रारूप विकास आराखडा तयार करून नागरिकांच्या सूचना व हरकतीसह तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याला पुढील आठवडाभरात मुख्यमंत्र्यांंची मंजुरी मिळेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित खालापूर स्मार्ट सिटीअंतर्गत मोडणाऱ्या ११ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांसह सिडकोने नैनाच्या तिसऱ्या टप्प्यात मोडणाऱ्या गावांच्या विकासाच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. यासंदर्भातील प्रारूप विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्याला मान्यताही देण्यात आली आहे. त्यानुसार सिडकोने त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविल्या आहेत.विशेष म्हणजे, २३ गावांच्या पायलट प्रोजेक्टचा विकास आराखडा गेल्या वर्षभरापासून लालफितीच्या विळख्यात अडकला आहे, असे असले तरी लवकरच त्याला राज्य सरकारची मंजुरी मिळेल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी व्यक्त केलाआहे. दरम्यान, पहिल्या टप्पा सात वर्षांत पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे, तर ११ गावांचा समावेश असलेल्या खालापूर स्मार्ट सिटीचा प्रकल्प पुढील वर्षापासून हाती घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)