शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कामोठेवासीयांची पाण्यासाठी वणवण

By admin | Updated: March 17, 2016 02:31 IST

कामोठेवासीयांना डिसेंबरपासूनच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. रोज १६ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा जाणवत असून, रहिवाशांनी या परिसरातून स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे.

- प्रशांत शेडगे,  पनवेलकामोठेवासीयांना डिसेंबरपासूनच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. रोज १६ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा जाणवत असून, रहिवाशांनी या परिसरातून स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. सिडकोच्या नियोजनातील चुकांचा फटका हजारो नागरिकांना बसत असून, येथील अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. शहराची शिल्पकार म्हणून सिडको प्रशासन स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. नवी मुंबई हे देशातील पहिले नियोजनबद्ध शहर वसविले व आता दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याचा संकल्प केला आहे. परंतु ज्या दिवशी स्मार्ट सिटीची घोषणा केली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामोठेवासीयांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली. डिसेंबरमध्येच नागरिकांवर पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली. पाणी प्रश्नाने पुन्हा एकदा सिडकोचे नियोजन चुकल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे. वास्तविक या नोडचा विकास करताना तेथे भविष्यातील लोकसंख्या विचारात घेवून पाणीपुरवठ्याची सोय करणे अत्यंत आवश्यक होते. परंतु सिडकोने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून पाणी घेवून ते या परिसराला पुरविण्यास सुरवात केली. दुसऱ्यावर अवलंबून असणारी पाणीपुरवठा यंत्रणा कधीही कोलमडू शकते याचाच प्रशासनास विसर पडला. पाणीटंचाईचे कारण सांगून महापालिकेने डिसेंबरमध्ये अचानक पाणीपुरवठा कमी केला असल्यामुळे परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होवू लागली आहे. गरजेपुरतेही पाणी मिळेनासे झाले आहे. पाणी कधी येईल याचा भरवसाही राहिला नाही. कामोठेपासून खांदेश्वर व मानसरोवर रेल्वे स्टेशन जवळ आहे. यामुळे भविष्याचा विचार करून नागरिकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून येथे घरे घेतली आहेत. कामोठे, जुई या गावांच्या परिसरात येथील भूमिपुत्रांनी मोठी गुुंतवणूक करून व प्रसंगी कर्ज घेवून इमारती बांधल्या आहेत. घरे भाड्याने देणे हा परिसरातील प्रमुख व्यवसाय झाला आहे. कामोठे परिसरात डिसेंबरमध्येच पाणी मिळेनासे झाल्याने नागरिकांनी घरे खाली करण्यास सुरवात केली आहे. भाडेतत्त्वावर राहणाऱ्या हजारो नागरिकांनी या परिसरातून स्थलांतर केले आहे. शेकडो इमारतींमधील अनेक सदनिका भाडेकरू मिळत नसल्याने मोकळ्या पडल्या आहेत. नागरिकांनी येथून स्थलांतर केल्यामुळे घर भाड्याने देणाऱ्यांचे नुकसान झाले आहेच, शिवाय इतर व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. येथील आर्थिक घडीच विस्कळीत झाली आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांनी बोअरवेल मारून पाण्यासाठी पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जादा पैसे देवून टँकरने पाणी आणावे लागत आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाणी पुरवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सिडको-मनपा भांडणाचा परिणाम सिडको प्रशासनाने ४ डिसेंबरला दक्षिण नवी मुंबई ही पहिली स्मार्ट सिटी बनविण्याची घोषणा केली. या कार्यक्रमात महापौरांना योग्य सन्मान दिला नाही.सिडकोने अप्रत्यक्षपणे महापालिकेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे नोव्हेंबरपर्यंत कामोठे परिसराला रोज ३० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेने डिसेंबरमध्ये तत्काळ २३ दशलक्ष लिटरवर प्रमाण आणले.कामोठे परिसरात रोज ४० एमएलडी पाणी पुरवठ्याची गरज आहे. परंतू सद्यस्थितीमध्ये २२ ते २३ एमएलडी पाणीच उपलब्ध होत आहे. अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे आम्हाला मागणीप्रमाणे पाणी देता येत नाही. सद्यस्थितीमध्ये शहरात ४० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. पुढील काळात नागरिकांना आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. हेटवणे धरणातील पाणीही कामोठे नोडला देण्याचे विचाराधीन आहे. - रमेश गिरी, अधीक्षक अभियंता, सिडको पाणीपुरवठा यावर्षी पुरेसा पाऊस पडला नसल्याने पाणीटंचाई सुरू आहे. पण कामोठेमधील रहिवाशांना वर्षभरच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचे हाल होवू लागले असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. - रेश्मा गायकर, सेक्टर २०, कामोठे सिडकोचा देशातील पहिली स्मार्ट सिटी बनविण्याचा आटापिटा पाहून त्यांची कीव कराविशी वाटत आहे. कामोठेमधील रहिवाशांना आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध करून देणेही प्रशासनाला शक्य होत नाही. पहिले पाणी द्या नंतर स्मार्ट सिटीचा विचार करा. - तृप्ती सुर्वे, गृहिणीसिडकोने कामोठेमधील समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. पाऊस कमी पडल्याने पाण्याची टंचाई भासणार हे माहीत असूनही काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. यामुळेच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सिडकोने फक्त वसाहत वसविण्याचे काम केले, नागरिकांच्या सुविधेचा विचारच केला नाही. - अनुराधा जगताप, कामोठेपाणी नसल्यामुळे रोजची काम करणं कठीण आहे. एक दिवसाआड आमच्या सोसायटीत पाणी येत असल्याने दैनंदिन कामाचा खोळंबा होतो. पाणी कमी दाबाने येत असल्याने चौथ्या मजल्याच्या वर पाणी चढत नाही. त्यामुळे आमच्या सोसायटीत बोअरवेल घेण्यात आली आहे. कामोठ्यासाठी पाणीपुरवठ्याची व्यवस्था नव्हती तर सिडकोने वसाहत का वसविली? - संघमित्रा सरकटे, गृहिणीकामोठ्यात पाण्याची समस्या गंभीर होत आहे. नवीन पनवेल येथे पाणीटंचाई नाही, मग कामोठ्यातच का? सिडकोने यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.- अश्विनी फुं दे, गृहिणीकामोठ्यात पाणी नसल्याने आम्ही दुसरीकडे भाड्याने घर घेण्याचा विचार करत आहोत. जे पाणी येत आहे, तेही चांगले येत नसल्याने बिसलरी पाणी मागवावे लागत आहे. - विद्या जोशी, गृहिणी