मुंबई : केईएममधील निवासी डॉक्टरच डेंग्यूची बळी ठरल्यामुळे पालिकेच्या आरोग्य खात्याचे धाबे दणाणले आह़े याची गंभीर दखल घेऊन महापौर दालनात आज तातडीची बैठकही बोलाविण्यात आली़ यामध्ये जनजागृती व तपासणीसाठी सहकार्य न करणा:या खासगी सोसायटय़ांवर सक्ती अथवा कारवाईचा संकेत देण्यात आला़
पावसाळा संपल्यानंतरही साथीच्या आजारांपैकी डेंग्यूने मुंबईत तळ ठोकला आह़े चांगल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याने उच्चभ्रू वसाहतींना याचा सर्वाधिक धोका आह़े यावर नियंत्रण आणण्यासाठी श्रीमंत लोकवस्तीमध्ये जनजागृती हाच एक मार्ग उरला आह़े मात्र उच्चभ्रू वसाहतीच्या प्रवेशद्वारावरूनच पालिका कर्मचा:यांना हाकलून देण्यात येत आह़े
ही बाब महापौर स्नेहल आंबेकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीतून समोर आली़ त्यामुळे अशा वसाहतींमध्ये पालिका कर्मचा:यांना जनजागृतीसाठी प्रवेश देण्याची
सक्ती करण्याचा विचार सुरू आह़े तसेच सहकार्य न करणा:या या सोसायटय़ांवर कोणती कारवाई करण्यात येईल, याबाबतही
चाचपणी सुरू झाल्याचे महापौरांनी सांगितल़े (प्रतिनिधी)
अशी झाली
आहे कारवाई
डेंग्यूचा धोका वाढत असतानाही उत्तुंग इमारती आणि उच्चभ्रू वसाहतींमध्ये डास प्रतिबंधक खबरदारी घेतली जात नसल्याचे उजेडात आले आह़े पालिकेच्या पाहणीत उच्च लोकवस्तींचा निष्काळजीपणा उघड झाल्यानंतर 92 निवासी सोसायटय़ांना कोर्टात खेचण्याचा निर्णय पालिकेने घेतला आह़े मात्र जनजागृतीसाठी प्रवेश न दिल्यास कोणती कारवाई करावी, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही़
खरे रुग्ण किती?
जूनपासून आतार्पयत डेंग्यूचे 134 रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत़ अशी पालिकेची आकडेवारी सांगत़े मात्र प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात दाखल होत असल्याचे आढळून येत आह़े
अशी वाढते डासांची पैदास : फेंगशुई व शोभेच्या वस्तूंमध्ये साठवलेल्या पाण्यात तसेच जुने टायर व बाटल्यांमध्ये या डासांची पैदास होत़े त्यामुळे अशा वस्तूंमधील पाणी बदलत राहणो, पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवणो असे नियम तयार करण्यात आले आहेत़ शोभेच्या वस्तूंमध्ये पाणी सतत बदलत ठेवण्याबाबत बिगर शासकीय संस्थांच्या मदतीने पालिकेची जनजागृती मोहीम सुरू आह़े
डेंग्यूची लागण होण्यास एडिस डास कारणीभूत असतो़ मात्र या डासांमध्ये झपाटय़ाने बदल होत चालला आह़े त्यामुळे या आजाराचे निदान होण्यापूर्वीच रुग्णांच्या रक्तपेशी कमी होत जातात़ त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरू करण्यापूर्वीच गुंतागुंत वाढत आह़े
पूर्वी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ताप आणि सांधेदुखी व अंगदुखी ही प्रमुख लक्षणो होती़ मात्र आता डेंग्यूच्या रुग्णांच्या रक्तपेशीत झपाटय़ाने घसरण होत असून न्युमोनिया होण्याचा धोका वाढत आह़े तसेच रुग्णाची शुद्धही हरपत असल्याने अशा रुग्णांवर उपचार करणो दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात़