शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कलिंगड, खरबुजाला मागणी वाढली

By admin | Updated: May 7, 2017 06:23 IST

वाढत्या उन्हाचा दाह कमी करणारे कलिंगड आणि खरबूज यांची मागणी वाढत आहे. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार

 - प्राची सोनवणे -नवी मुंबई : वाढत्या उन्हाचा दाह कमी करणारे कलिंगड आणि खरबूज यांची मागणी वाढत आहे. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्नाटक, मध्यप्रदेशातून कलिंगडांची आवक केली जात आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून खरबुजांची आवक होत आहे. शनिवारी ५४८५ क्विंटल कलिंगडांची आवक झाली, तर १२४० खरबुजांची आवक झाली. फेबु्रवारी ते मे या कालावधीत कलिंगडांचा हंगाम पाहायला मिळतो. कर्नाटक, मध्यप्रदेशातील कलिंगडाच्या आवकेचा हंगाम संपत आला असून, आता नगर, सोलापूर, शिरूर अशा महाराष्ट्रातील विविध भागांतून कलिंगडांची आवक सुरू झाली आहे. घाऊक बाजारपेठते १० ते १८ रुपये किलो दराने कलिंगड उपलब्ध आहे, तर १२ ते १४ रुपये किलोने खरबुजाची विक्री केली जात आहे. ‘मधुबाला’ किंवा ‘नामधारी’ ही परराज्यातील, तर स्थानिक भागातील ‘आॅगस्टा’, ‘शुगरबेबी’ जातीच्या कलिंगडांना ग्राहकांची पसंती असते. परराज्यातील कलिंगड लाल मातीत उत्पादित केली जातात. चवीला गोड, आकार मोठा, टिकण्यास चांगली यामुळे या कलिंगडांना ग्राहकांकडून जास्त मागणी असते. तुलनेत स्थानिक परिसरातील कलिंगडांना कमी मागणी असल्याचे पाहायला मिळते. हातगाडीवर कलिंगड विकणारे, फ्रूट डीशविक्रे ते यांच्याप्रमाणे घरगुती ग्राहकांकडून मागणी वाढल्याचे त्यांनी नमूद केले. बॉबी, कुंदन, नामधारी अशा जातीच्या खरबुजांना अधिक मागणी आहे. किरकोळ बाजारपेठेत कलिंगड १५ ते २५ रुपये किलोने उपलब्ध आहे, तर खरबूज १४ ते २० रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. चायनीज कलिंगडाला मागणीत्यातच चायनीज बीज वापरून लागवड केलेल्या चायनीय कलिंगडाला बाजारामध्ये चांगली मागणी आहे. चायनीज कलिंगडामध्ये, ‘शुगर किंग’, ‘सागर किंग’, ‘किरण’, ‘ब्लॅक बॉय’ नावाची कलिंगड बाजारात दाखल झाली आहेत. ही कलिंगडे चवीला गोड आणि वजनाने जास्त भरतात. त्यामुळे ग्राहकांकडून चायनीज कलिंगडांची मागणी वाढतेय. मॉलमध्ये चायनीज कलिंगड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कलिंगडात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तसेच समप्रमाणात ग्लुकोजची मात्रा असल्याने शरीरात थंडावा निर्माण करते. या फळात पोटॅशिअमची मात्रादेखील जास्त असून, शरीरातील रक्ताची घनआम्लता समप्रमाणात ठेवण्यास मदत होते.