शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या विकासाशी आघाडी कटिबद्ध

By admin | Updated: May 4, 2017 06:17 IST

शेतकरी कामगार पक्ष, काँगे्रस व राष्ट्रवादी आघाडीची वज्रमूठ एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी जात आहे. पनवेलच्या

पनवेल : शेतकरी कामगार पक्ष, काँगे्रस व राष्ट्रवादी आघाडीची वज्रमूठ एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी जात आहे. पनवेलच्या विकासाशी आम्ही कटिबद्ध आहोत व आम्ही यापूर्वी विकास केल व यापुढेही करून दाखविणार. आमची पक्षाशी व विचारांशी बांधीलकी आहे; परंतु दुसरीकडे स्वार्थासाठी पाच वर्षांनी पक्ष बदलणारे भाजपातून निवडणूक लढवत असून त्यांच्यामुळेच पनवेलचा विकास खुंटल्याची टीका शेकापचे नेते विवेक पाटील यांनी केली आहे. पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमत व्यासपीठ उपक्रमामध्ये विवेक पाटील यांनी शेकाप, काँगे्रस व राष्ट्रवादीच्या आघाडीची भूमिका विशद केली. निवडणुका आल्या की अनेकजण आश्वासनांशी खैरात करतात व पक्ष कार्यालये सुरू करतात; पण शेकापची चोवीस तास जनतेशी बांधीलकी आहे. निवडणुका नसल्या तरी आम्ही नियमितपणे जनतेच्या संपर्कात असतो. सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही आम्ही आघाडीवर असतो. महापालिकेमधील वेतनापासून वंचित कामगारांना न्याय देण्यासाठी आंदोलन केले. बाळाराम पाटील यांनी विधानपरिषदेमध्ये आवाज उठविला. खारघर ते कळंबोली, कामोठे परिसरामध्ये अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्या कंडोनियमअंतर्गत कामे मार्गी लावली. मालमत्ता कराविषयी जनहिताची भूमिका घेतली. प्रत्येक नागरिक आपलाच समजून त्याच्या अडचणी सोडविण्यास शेकापने नेहमीच प्राधान्य दिले आहे. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील पाणीप्रश्न सोडविण्यावर भर देणार. चांगले रस्ते, शाळा, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देणार आहोत. आम्ही विचारांची लढाई लढत असून आमची बांधीलकी सर्वसामान्य नागरिकांशी आहे. दुसरीकडे स्वार्थासाठी प्रत्येक पाच वर्षांनी पक्ष बदलणारे आहेत. प्रशांत ठाकूर यांनी खारघर टोलनाका बंद करण्यासाठी काँगे्रस सोडली; पण टोल बंद झाला नाही. उलट निवडणुकीनंतर त्यांच्याशी संबंधित कंपनीने उरणमधील दोन टोल नाक्यांचे ठेके घेतले. म्हणजे स्वत:च्या कंपनीला ठेका मिळाला की टोल हवा व जिथे मिळाला नाही तिथे टोलमुक्ती असा त्यांचा अजेंडा असल्याची टीकाही केली. भाजपा निवडणुकांच्या तोंडावर आमच्यावर आरोप करत आहे; पण त्यांची नगरपालिकेत सत्ता असताना वडाळे तलवात दासभक्तांनी केलेल्या कामांची खोटे बिले लाटली असल्याचा आरोपही त्यांनी भाजपावर केला. आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समित्या, कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जिंकल्या असून महापालिकेमध्येही विजय मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सदैव जनतेसोबतनिवडणुका आल्या की प्रत्येकजण कार्यालये सुरू करतात; परंतु शेतकरी कामगार पक्ष सदैव जनतेबरोबर होता व भविष्यातही जनतेसोबत राहील. सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आम्ही लढे दिले आहेत. पनवेल विकसित होत असताना देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येथे राहण्यासाठी येत आहेत. कोणताही जातीभेद, प्रांतभेद न करता सर्वांनाबरोबर घेऊन जात असल्यानेच शेकाप प्रत्येकाला आपला पक्ष वाटत असल्याचेही स्पष्ट केले. पनवेलचा सर्वांगीण विकास शेतकरी कामगार पक्षाचे जे. एम. म्हात्रे पनवेलचे नगराध्यक्ष असताना एका वर्षात उत्पन्न दुप्पट केले व कार्यकाल पूर्ण करेपर्यंत उत्पन्नामध्ये चारपट वाढले. पनवेल महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक १२०० कोटी गृहित धरले जात आहे. आम्ही पालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवून पाच वर्षांत ते उत्पन्न ५००० कोटीवर. पनवेल मधील पिण्याचा प्रश्न गंभीर आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी देहरंग धरणातील गाळ काढला असता तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असताच. भविष्यात आम्ही स्वत:च्या मालकीचे पाण्याचे स्रोत वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणार असून आमच्या जाहीरनाम्यात पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे धोरण असणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.