शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या आमिषाने फसवणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2015 23:38 IST

तरुणीसोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून फसवणाऱ्याला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याने एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवरून तरुणीसोबत ओळख वाढवली होती.

नवी मुंबई : तरुणीसोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून फसवणाऱ्याला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याने एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवरून तरुणीसोबत ओळख वाढवली होती.रुपेश यशवंतराव (३४) असे त्याचे नाव आहे. त्याने कोपरखैरणेतील एका तरुणीची लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली होती. या तरुणीने एका मॅट्रिमोनियल साइटवर नोंदणी केली होती. राजेश देशमुख उर्फ अब्दुल शेख याने तिच्यासोबत ओळख वाढवली होती. फेसबुकद्वारे त्याने या तरुणीसोबत ओळख केलेली. त्यानंतर दोघांची भेट झाली असता राजेश याने तिच्यासोबत लग्नाची इच्छा व्यक्त केलेली. मात्र यानंतर तो विविध कारणाने तिच्याकडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला होता. तरुणीने कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतु केवळ फेसबुकवरील बनावट अकाऊंटवरून त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. या भामट्याचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संभाजी कटारे, अशोक पवार व इतर कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी कसून तपास करून या भामट्याला अटक केली आहे. चौकशीत त्याचे खरे नाव रुपेश यशवंतराव असल्याचे समोर आले. रुपेश हा डोंबिवलीचा असून मूळचा मुरबाडचा आहे. त्याच्याकडून लुटीचे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने व ४० हजार रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. (प्रतिनिधी)