शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

स्टील मार्केटमध्ये अंधाराचे साम्राज्य

By admin | Updated: February 19, 2016 02:37 IST

कळंबोली येथील स्टील मार्केट आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट असून, याची बाहेरील राज्यात ख्याती आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा परिसर गडद अंधारात हरवला आहे

शैलेश चव्हाण,  तळोजाकळंबोली येथील स्टील मार्केट आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट असून, याची बाहेरील राज्यात ख्याती आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा परिसर गडद अंधारात हरवला आहे. तक्रारी करूनसुद्धा या वीज पोलवरील दिवे लागत नाहीत. स्टील मार्केटमधून दररोज कोट्यवधींची उलाढाल होत आहे. मात्र, येथील पायाभूत सुविधांकडेही लक्ष देण्यासाठी प्रशासनाला वेळ नाही. यामुळे येथील व्यावसायिक आणि परिसरातील रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.कळंबोली स्टील मार्केट परिसरात बिमा कॉम्प्लेक्स, टाटा स्टील, एसीसी सिमेंट, पनवेल प्रादेशिक कार्यालय, एमटीएनएल कार्यालय, महावितरणचे सब स्टेशन असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. त्यासाठी माल खरेदी आणि विक्रीसाठी येथे मोठ्या प्रमाणावर वाहने येत असतात. दिवसा वाहने या परिसरात उभी राहिली की, रात्रीच्या वेळी ही वाहने रामभरोसे असतात. या परिसरात असलेल्या अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर मोजकी ठिकाणे सोडली, तर बऱ्याच ठिकाणी दिवे नसल्याने या परिसरात चोरीच्या घटना घडत आहेत. रात्री आठ वाजल्यानंतर या परिसरात कोणीही फिरकत नाही. जवळच कळंबोली रेल्वे स्थानक आहे. मात्र, परिसरात असलेल्या अंधारामुळे व गैरसोईमुळे कळंबोलीतील रहिवासी पनवेलला जाणे पसंत करत आहेत. रात्रीच्या वेळेस भुरट्या चोरांकडून कंटेनर फोडणे, स्टील चोरणे अशा घटना वारंवार घडत असून, या अंधारामुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याचे व्यावसायिक सांगतात. वारंवार पाठपुरावा करून संबंधित प्रशासन दखल घेत नाही, याची खंत येथील व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.