शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीत रस्त्यांचे झाले डम्पिंग

By admin | Updated: April 20, 2016 02:38 IST

शहरात दररोज हजारो टन कचरा तयार होतो. मात्र तो नियमित उचलला जात नसल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कळंबोली : शहरात दररोज हजारो टन कचरा तयार होतो. मात्र तो नियमित उचलला जात नसल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे पादचारी तसेच स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. शिवाय वसाहतीतही स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. सिडकोकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने अनेक सेक्टरमधील रस्त्यांना डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे.कचरा गोळा करणाऱ्या गाड्या नियमित येत नसल्याने आणि सर्व भागात गाड्या जात नसल्याने नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. कळंबोलीतील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या बहुतांश कचराकुंड्या नेहमीच ओसंडून भरलेल्या दिसतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, पादचाऱ्यांना नाक मुठीत घेऊन जावे लागते. अंतर्गत रस्त्यावर प्रत्येक सोसायटीसमोर बिन्स ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये कचरा टाकला जातो. मात्र सिडकोकडून तो दोन ते तीन दिवस उचलला जात नाही. मोकाट गुरांकडून कचरा सर्वत्र पसरवला जात असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सेक्टर १४ मध्ये ज्ञानमंदिर शाळेच्या आजूबाजूच्या सोसायट्यांचा कचरा उचलला जात नाही. त्यामुळे रस्त्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ज्ञानदीप शाळेच्या पाठीमागे असलेल्या सोसायट्यांसमोर तर कचऱ्याचा ढीग लागला आहे. अनेक मोकळ्या भूखंडावर हॉटेल चालकांकडून कचरा टाकला जातो. ठेकेदाराकडे पुरेशा गाड्या नसल्याचे सेक्टर १४, १५ येथील कचरा नियमीच उचलला जात नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, मलेरिया आणि डेग्यूचे रुग्ण वाढत आहेत. कचरा उचलण्याचा ठेका असलेल्या बीवीजी कंपनीच्या निष्क्रियतेमुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सिडकोकडूनही संबंधितांवर कडक कारवाई होत नसल्याने आरोग्य धोक्यात आहे. याप्रकरणी सिडकोने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)