शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगच्या मुद्द्यावरून रणकंदन

By admin | Updated: June 2, 2017 05:44 IST

नगरपरिषदेच्या विशेष सभेत सुधारित विकास आराखड्यातील पार्किंग आरक्षणाच्या विषयावर सेना-भाजपामध्ये चांगलीच जुंपली

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : नगरपरिषदेच्या विशेष सभेत सुधारित विकास आराखड्यातील पार्किंग आरक्षणाच्या विषयावर सेना-भाजपामध्ये चांगलीच जुंपली. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्यानंतर ठराव सेना सदस्यांच्या विरोधानंतर मंजूर झाला. मात्र, विशेष सभा संपताच सेना-भाजपा नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी परस्परांवर धावत जाऊन, माईक फेकून मारणे, बिस्लरी पाण्याच्या बाटल्या फेकल्या, शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्यांच्या प्रकारानंतर तर सभागृहातच रणकंदन माजले. उरण नगरपरिषदेने बुधवारी विशेष सभा बोलाविली होती. फक्त तीन विषयांवर बोलाविण्यात आलेल्या बैठकीत पहिलाच विषय, सुधारित विकास योजनेतील पार्किंगसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या मौजे चाणजे स.नं.८४मधील आरक्षण क्रमांक ४९, हा विषय चर्चेसाठी पुकारण्यात आला होता. सेनेचे नगरसेवक गटनेते गणेश शिंदे यांनी शासनाने याआधीच आरक्षण क्र. ४९ आणि ४९ अ असे दोन्ही पार्किंगच्या आरक्षित जागांचे आरक्षण कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तशा प्रकारचा जीआरही काढण्यात आला आहे. त्यामुळे हे आरक्षण बदलण्यामागे बिल्डर्सच्या फायद्याचे धोरण भाजपा सत्ताधाऱ्यांनी अवलंबिले असल्याचा आरोप करीत, या ठरावालाच सेनेने जोरदार विरोध केला. या विषयावरील चर्चेनंतर सेना-भाजपा नगरसेवकांमध्येच वादाला तोंड फुटले. नगरसेवकांमध्येच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सत्ताधाऱ्यांनी पार्किंगचा ठराव सेनेच्या विरोधानंतरही संख्याबळाच्या जोरावर मंजूर करून घेतला.विशेष सभा आटोपल्यानंतर दोन्ही गटांकडील नगरसेवक आणि त्यांचे समर्थक सभागृहातच एकमेकांशी भिडले. परस्परांवर धावत जाऊन माईक, पाण्याच्या बाटल्या फेकल्या, शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. शासकीय ठरावाची कागदपत्रेही शासकीय कर्मचारी नगरसेवकांच्या हातातून खेचण्याचे प्रकार घडले. सुमारे १० मिनिटे चाललेला गदारोळ मोठ्या प्रयत्नाने शांत झाला. याप्रकरणी सेनेचे गटनेते गणेश शिंदे यांनी भाजपा कार्यकर्त्यांविरोधात, तर भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना नगरसेवक अशा परस्परविरोधी उरण पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.याप्रकरणी नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी सेनेचे गटनेते गणेश शिंदे यांना दोष दिला आहे. माजी नगराध्यक्षपद भूषविलेले असतानाही सभागृहात महिला नगराध्यक्षांशी कसे बोलावे? यांची गटनेत्यांना जाणीव नसावी, याबद्दल त्यांनी खेदही व्यक्त केला. तर सुधारित विकास आराखड्यातील आरक्षण बदलण्यामागे बिल्डर्सला आर्थिक फायदा करून देणे, हाच भाजपाचा मूळ हेतू असल्याचा आरोप सेनेचे गटनेते गणेश शिंदे यांनी या वेळी के ला.