शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोली सर्कलवर वाहनांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:06 IST

ट्रेन बंद असल्याने रस्ते वाहतुकीचा ताण : कामावर जाणाऱ्या नागरिकांची होत आहे गैरसोय

वैभव गायकर।लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : सायन पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कलवर दररोज प्रचंड वाहतूककोंडी होते आहे. ट्रेन बंद असल्याने रस्ते वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढल्याने, येथे सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पाहायला मिळते आहे. सर्कलजवळील ५ मिनिटांचे अंतर गाठण्यासाठी तब्बल ३० ते ४५ मिनिटांपर्यंत या ठिकाणी थांबावे लागत आहे.

कळंबोली सर्कलजवळ सायन पनवेल महामार्ग, कळंबोली मुंब्रा महामार्ग, मुंबई पुणे महामार्ग आदींसह कळंबोली जेएनपीटी आदी महामार्ग एकत्र येतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. लॉकडाऊनच्या काळात ट्रेन बंद असल्याने नोकरदार वर्ग खासगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहे,तसेच या परिसराला लागून जेएनपीटी बंदरावर जाण्यासाठी राज्यभरातील मालवाहतूक वाहने येथून जात असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे. यामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच तारंबळ उडत आहे. सकाळी व संध्याकाळी होणाºया वाहतूककोंडीवर उपाय म्हणून अवजड वाहनांना ठरावीक वेळेत बंदी घालण्याची मागणी नागरिक करीत आहेत. ट्रेन सुरू झाल्या तर वाहनकोंडीतून सुटका होईल, असे सांगितले जात आहे.

वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आठ वाहतूक पोलीस नेमलेले आहेत. या मार्गावर जेएनपीटीकडे जाणाºया अवजड वाहनांची संख्याही मोठी आहे.- अंकुश खेडेकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कळंबोली वाहतूक शाखा

सकाळी व सायंकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी वाढत आहे. अवजड वाहने यासाठी कारणीभूत असल्याने ठरावीक वेळेसाठी अवजड वाहनांवर या ठिकाणी बंदी घालण्याची गरज आहे.- प्रशांत कदम,उपाध्यक्ष,मनसे कळंबोली शहर