शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई आराखड्याची कोटींची उड्डाणे

By admin | Updated: March 10, 2016 02:22 IST

जिल्ह्यातील पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यापेक्षा जलदगतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होणाऱ्या पर्यायाचाच विचार केल्याचे जिल्ह्याच्या टंचाई कृती आराखड्यावरून दिसून येते.

आविष्कार देसाई, अलिबागजिल्ह्यातील पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यापेक्षा जलदगतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होणाऱ्या पर्यायाचाच विचार केल्याचे जिल्ह्याच्या टंचाई कृती आराखड्यावरून दिसून येते. टँकरने पाणीपुरवठा करण्याचा आकडा हा तब्बल सात कोटी ५० लाख ८९ हजार रुपयांवर पोचणार आहे. त्यामुळे सरकारच्या काही मार्गदर्शक सूचनांना राजकीय आणि प्रशायकीय यंत्रणेने तिलांजली दिल्याचे अधोरेखित होत आहे.अपुऱ्या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील विविध धरणांत सुमारे ६० टक्के जमा झालेला पाणीसाठा आता तळपत्या उन्हाने सुमारे ५० टक्क्यांवर आला आहे. धरणे तळ गाठण्याच्या तयारीत असल्याने जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. जिल्ह्यामध्ये ४३३ गावे, एक हजार ४३३ वाड्या टंचाईग्रस्त घोषित करण्यात आल्या आहेत. टंचाई निवारण्यासाठी २०१५-१६ साठी सात कोटी ८८ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. गेल्यावर्षी हाच आकडा पाहिला तर ५८१ गावे, ९९५ वाड्यांसाठी सहा कोटी ८८ लाख ९९ हजार रुपये खर्च करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी ज्यांनी टँकरने पाणीपुरवठा केला होता त्यांची बिलेही अद्याप अदा केली नसल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. सरकारच्या नियमांप्रमाणे टँकर ही कमी खर्चाची योजना टंचाई कृती आराखड्यात समाविष्ठ करणे गरजेचे असेल, तर अजून किती वर्षे टँकरने पाणीपुरवठा करायचा आणि कमी खर्चाची योजना म्हणून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करायचे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. टंचाई क्षेत्रातून पाण्याचे संकट दूर व्हावे, यासाठी सरकारने काही मार्गदर्शक सूचना ३ फेब्रुवारी १९९९ च्या सरकारी निर्णयाने जारी केल्या होत्या. बुडक्या घेणे, विहिरी खोल करणे, गाळ काढणे, विहिरी अधिग्रहण करणे, प्रगतीपथावरील नळ पाणीपुरवठा योजना करणे, त्यांची दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहीर घेणे, तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा योजना करणे, विंधन विहिरींचे जल भंजण करणे याचा समावेश आहे. मात्र २०१४-१५ आणि १०१५-१६ च्या कृती आराखड्यात राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणांनी या बाबींना कृती आराखड्यातच बगल दिल्याचे दिसून येते.