शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांचे पद धोक्यात

By admin | Updated: March 2, 2016 02:13 IST

अवतीभोवती सत्तेची वर्तुळे असली की कायदेही धाब्यावर बसविले तरी चालतात, असा समज सत्ताधारी राजकारण्यांमध्ये ठासून भरल्याचे सर्वत्र दिसून येत आहे

आविष्कार देसाई,  अलिबागअवतीभोवती सत्तेची वर्तुळे असली की कायदेही धाब्यावर बसविले तरी चालतात, असा समज सत्ताधारी राजकारण्यांमध्ये ठासून भरल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमधून डोकवणारी सत्तेची ही मस्ती उतरविण्यासाठी कायद्याचाच आधार घेतला जातो, हे कदाचित कायदे पायदळी तुडविणाऱ्यांच्या गावी नसावे. याच संविधानावर विश्वास ठेवत महाराष्ट्र स्थानिक सदस्य अनर्हत अधिनियम १९८७ नुसार कारवाई करण्याबाबतची पाच प्रकरणे, तर ३०८ नुसार एक प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणीसाठी दाखल झाली आहेत. यामध्ये २६ नगरसेवकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.माथेरानचे नगरपालिकेचे नगरसेवक दिलीप गुप्ता आणि विनिता गुप्ता यांनी माथेरान येथे कायदे पायदळी तुडवीत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दोघांचेही सदस्यत्व रद्द केले आहे. त्याचप्रमाणे मुरुड नगरपालिकेच्या नगरसेविका नादीया नाखुदा यांनीही कायद्याला न जुमानता सहा महिने गैरहजर राहिल्याचा फटका बसला. त्यांचेही नगरसेवक पद तेली-उगले यांनी रद्द केले आहे. हे तीनही निकाल नजीकच्या कालावधीतच देण्यात आले आहेत.पनवेल नगरपालिकेमधील प्रकाश बिनेदार आणि जयंत पगडे यांच्या सदस्यत्वाला निर्मला म्हात्रे यांनी आव्हान दिले आहे. मुरुड नगरपालिकेतील सदस्य महेश भगत यांच्यासह संदीप पाटील, कल्पना पाटील, अशोक धुमाळ, मेघाली पाटील आणि उदय भाटकर यांनी व्हिप (पक्षादेश) धुडाकावल्याची याचिका अविनाश दांडेकर यांनी दाखल केली आहे. नुकत्याच अस्तित्वात आलेल्या माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या विरोधातही याचिका दाखल झाली आहे. यादव हे पूर्वी माणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्यावेळी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.