शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षण केंद्राच्या कामात भ्रष्टाचार?

By admin | Updated: March 2, 2016 02:19 IST

प्रकल्पग्रस्त तरुणांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून बेलापूर येथे युवा कामगार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्त तरुणांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून बेलापूर येथे युवा कामगार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तथा प्रकल्पग्रस्त ठेकेदार सुरेश काशिनाथ मढवी यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया आणि मुख्य दक्षता अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याकडे केली आहे.सिडकोने मागील दोन अडीच वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यांच्या पाल्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना स्पर्धात्मक परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन देण्यासाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बेलापूर रेल्वे स्थानकाच्या सातव्या मजल्यावर प्रकल्पग्रस्त युवा कामगार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्राच्या उभारणीसाठी अंतर्गत सजावट, बांधकाम, प्लास्टर, फ्लोअरिंग, फर्निचर, इलेक्ट्रीकल्स वर्क आदी कामांसाठी विशेष बाब म्हणून ८६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. विशेष म्हणजे छोटी अर्थात ए २ प्रकारात मोडणारी कामे प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना देण्याचे सिडकोचे जुने धोरण आहे. परंतु या प्रशिक्षण केंद्राचे कामे करताना या धोरणाला हरताळ फासल्याचा आरोप सुरेश मढवी यांनी केला आहे. ८५ लाखांची कामे देताना मोजक्याच ठेकेदारांवर मेहरनजर करण्यात आली. कोणतेही काम काढताना नियमानुसार त्याची जाहिरात देणे गरजेचे असते. परंतु या प्रकरणात कोणतीही जाहिरातबाजी न करता परस्पर कामांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकाराला प्रामुख्याने सहाय्यक अभियंता अनिल रांजनगांवकर हे जबाबदार असून चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मढवी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)