शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांना टॅबचा मोह सुटेना

By admin | Updated: February 16, 2016 02:59 IST

महापालिकेचा संपूर्ण कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला आहे. तर प्रशासनाचाच प्रयत्न फसल्याची संधी साधत नगरसेवकांनाही टॅबचा मोह अनावर झाल्याचे दिसत आहे

नवी मुंबई : महापालिकेचा संपूर्ण कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला आहे. तर प्रशासनाचाच प्रयत्न फसल्याची संधी साधत नगरसेवकांनाही टॅबचा मोह अनावर झाल्याचे दिसत आहे. यामुळे पालिकेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या मागील पंचवार्षिक कालाधीत तत्कालीन महापौर सागर नाईक यांच्या संकल्पनेतून नगरसेवक व अधिकाऱ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले होते. महापालिकेचे संपूर्ण कामकाज पेपरलेस व्हावे, या दृष्टीने त्यांनी हे पाऊल उचलले होते. या संकल्पने अंतर्गत नगरसेवक, अधिकारी यांना टॅबवरच विषयपत्रिका मिळणार होती. ८९ नगरसेवक व अधिकारी अशा १२२ जणांना हे टॅब देण्यात आले होते. टॅबवर विषयपत्रिका पाहता यावी, याकरिता विशेष अ‍ॅप्लिकेशन देखील तयार करण्यात आले होते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ४५ लाखांहून अधिक रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. मात्र पेपरलेस कामकाजाची संपूर्ण संकल्पनाच फेल ठरल्याचे दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीनंतर दुसऱ्या पंचवार्षिक कालावधीस सुरुवात होऊन सुमारे ११ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीही गत कालखंडातील नगरसेवकांनी हे टॅब परत केलेले नाहीत. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना देण्यात आलेले टॅब कालखंड संपल्यानंतर परत जमा करायचे असल्याचे गुपित काहीसे उशिरा उघड झाले होते. त्यामुळे वाटप झालेले टॅब कायमस्वरूपी आपलेच असल्याचा गैरसमज काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना झालेला असावा. यामुळे त्यांनी सदर टॅब पालिकेला परत केलेले नाहीत. परंतु जे नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत त्यांच्याकडूनही टॅबचा वापर होत असल्याचे सभागृहात दिसत नाही. सद्य:स्थितीला गतकालखंडातील ४८ नगरसेवक व त्यांचे नातेवाईक सभागृहात आहेत. त्यापैकी २५ नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत. तर १३ नगरसेवकांच्या पत्नी, ९ नगरसेविकांचे पती व दोन जणांची मुले असे ४८ जण निवडून आले आहेत. नगरसेवकांना टॅब दिल्यानंतर परिवहन व शिक्षण मंडळ सदस्यांनाही टॅबचे स्वप्न पडू लागले होते. त्यांनीही स्वत:साठी पालिकेकडे टॅबची मागणी करायला सुरुवात केली होती. मात्र ज्यांना टॅब दिले त्यांनीच परत केले नसल्याने पालिकेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. अवघ्या १३ जणांनी अद्यापपर्यंत पालिकेला टॅब परत केले आहेत. त्यामध्ये तत्कालीन आयुक्त आबासाहेब जऱ्हाड व नगररचनाकार प्रकाश ठाकूर यांच्यासह ११ लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. त्यापैकी नामदेव भगत यांनी निवडणूकदरम्यान टॅब परत करून निवडून आल्यानंतर तो पुन्हा घेतला आहे. मात्र सेसचे तत्कालीन अधिकारी सुधीर चेके यांनी महापालिकेतून बदली झाल्यानंतरही टॅब परत केलेला नाही. यावरून लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनाही टॅबचा मोह सुटत नसल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)