शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

CoronaVirus News: १२ दिवसांमध्ये नवी मुंबईत वाढले १० हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:55 IST

आरोग्य विभागावरील ताण वाढला

- नामदेव मोरेनवी मुंबई : शहरामध्ये कोरोनाने हाहाकार माजविला आहे. १२ दिवसांमध्ये तब्बल १० हजार २४३ रुग्ण वाढले असून फक्त ४,६९१ जण बरे झाले आहेत. आरोग्य विभागावरील ताण वाढला असून रुग्णालयांमध्ये आयसीयू व व्हेंटीलेटर्स विभागात जागा मिळेना झाली आहे. मृत्यूचा आकडाही वाढू लागला आहे.   नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट धोकादायक ठरली आहे. सर्वच विभागांमध्ये झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर उभे राहिले आहे. ३ एप्रिलपासून प्रतिदिन १ हजार पेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. २५ मार्चपासून शहरात तब्बल १०,२४३ रुग्ण वाढले आहेत. या तुलनेमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. दहा दिवसांमध्ये ४,६९१ जणच बरे झाले आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून ९,१५४ झाली आहे. रुग्णालयांमध्ये जागा कमी असल्यामुळे जास्त लक्षणे नसणा-यावर घरामध्येच उपचार सुरू केले आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही कमी होऊ लागला आहे. जानेवारीमध्येे दुपटीचा कालावधी ६०० दिवसांवर गेला होता. तो कमी होऊन ५२ दिवसांवर आला असून त्यामुळे आरोग्य विभागाचीही चिंता वाढली आहे. दोन महिन्यापूर्वी प्रतिदिन १ किंवा २ जणांचा मृत्यू होत होता. काही वेळा मृत्यृची संख्या शून्यावर आली होती. परंतु मागील १० दिवसांमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. परंतु अनेक नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. नियमांचे उल्लंघन करणा-यामुळे प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.दहा दिवसांमधील काेरोनाची स्थितीतारीख     रूग्ण    कोरोनामुक्त२५ मार्च    ६८१    १५९२६ मार्च    ६१०    २७३२७ मार्च    ७७०    २६७२८ मार्च     ७१७    २४७२९ मार्च    ४९२    ३१३३० मार्च    ६९०    ३६८३१ मार्च    ५५४    ३७११ एप्रिल    ९७१    ४०३२ एप्रिल    ९७७    ४७२३ एप्रिल    १२०५    ६२७४ एप्रिल    १४४१    ५१८५ एप्रिल    ११३५    ६७३विभागवार सक्रिय रुग्णांचा तपशीलविभाग    रुग्णबेलापूर    १७०१ऐरोली    १३८१नेरुळ    १४५५कोपरखैरणे     १२५६वाशी                 १२२८तुर्भे                 ९८३घणसोली    ९१८दिघा                 २३२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या