शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: खारघर शहरात दुकानदारांची निदर्शने; पनवेलमध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:53 IST

लॉकडाऊनबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम

पनवेल : शासनाच्या निर्देशानुसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊनचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दि. ५ रोजी रात्री उशिरा पारित केले. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी ब्रेक द चेन चा नारा देत दि. ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत. यानुसार पालिका क्षेत्रात कलम १४४ लागू करण्यात आले असून सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक व्यक्तींना  सार्वजनिक ठिकाणी एकत्रित जमता अथवा फिरता येणार नाही. शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजे पर्यंत वैध कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.             पालिकेचा हा आदेश सोमवारी रात्री आल्याने दुसऱ्या दिवशी मंगळवारी व्यापारी , दुकानदार ,लहान व्यावसायिक संभ्रमात होते. काहींनी सकाळी दुकाने सुरु केली होती. त्यानंतर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने दुकाने बंद करण्याच्या सूचना संबंधित आस्थापनांना दिल्यानंतर दुकाने बंद करण्यास सुरुवात झाली. पनवेल शहरात सकाळी दुकाने सुरु होती. मात्र ११ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळून सर्व दुकाने बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम झाला. विशेष म्हणजे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना  रिकाम्या हाती परतावे लागले. खारघर शहरात दुकाने बंद करण्याच्या सूचना करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसमोर  शेकडो व्यापाऱ्यांनी घोषणाबाजी करीत लॉकडाऊनचा विरोध केला. शहरातील सेक्टर १२ येथील नवरंग चौकात दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत लॉकडाऊनच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेकडोच्या  संख्येने एकत्र येऊन गर्दी जमविल्याप्रकरणी संबंधितांवर खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी गुन्हे दाखल केले आहेत. खांदा कॉलनी, कामोठे ,कळंबोली , नवीन पनवेल , तळोजा आदी ठिकाणी सकाळी सुरू करण्यात आलेली दुकाने पोलिसांच्या सूचनेने व्यापाऱ्यांनी ११ च्या दरम्यान बंद केली .अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यात आली होती.         शहरी भागात दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली असताना ग्रामीण भागातील दुकाने बहुतांशी सुरूच असल्याचे पहावयास मिळाले. पोलिसांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृती करण्यात आली असली तरी शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी असल्याने बहुतांशी दुकानदारांनी दिवसभर दुकाने  सुरूच ठेवल्याचे काही ठिकाणी पहावयास मिळाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या