शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: निर्बंध माहीत नसल्याने बहुतांश दुकाने सुरूच; नवी मुंबईमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 01:57 IST

पोलिसांसह महानगरपालिकेच्या पथकांची जनजागृती सुरू

नवी मुंबई :  ब्रेक द चेन अभियानांतर्गत शासनाने सोमवारी रात्रीपासून कडक निर्बंध लागू केले आहेत; परंतु नक्की काय बंद राहणार व काय सुरू राहणार, याची माहिती व्यावसायिकांना नसल्यामुळे दिवसभर संभ्रमाचे वातावरण होते. कपडे, हार्डवेअर, गॅरेज, फर्निचर व इतर अनेक दुकाने दिवसभर सुरूच होती. पोलीस व महानगरपालिकेची पथके दिवसभर शहरात गस्त घालून निर्बंध असलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होती.            नवी मुंबईमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभागावर ताण निर्माण झाला असून रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध होत नाही. यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकने कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. शासनाने लागू केलेले नवीन निर्बंध लागू केले आहेत; परंतु पहिल्याच दिवशी अनेक विभागांत नियम डावलून अनेक दुकाने सुरूच असल्याचे निदर्शनास येत होते. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत; परंतु हे आदेश नागरिकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. परिणामी सीबीडी, सिवूड, नेरूळ, जुईनगर, वाशी ते संपूर्ण शहरात अनेक दुकाने सुरूच होती. कपडे, हार्डवेअर, फर्निचर, चहा, चप्पल, गॅरेज व इतर दुकानेही सुरूच होती. अनेकांनी शटर अर्धे बंद ठेवले होते. ग्राहक आले की, त्यांना वस्तू दिल्या जात होत्या. ग्राहक गेले की, पुन्हा शटर अर्धे बंद करून घेतले जात होते.   शहरातील अनेक फेरीवाल्यांनी त्यांचा व्यवसाय सुरूच ठेवला होता. भाजीपाला, फळे या व्यतिरिक्त इतर वस्तू विक्री करणारे फेरीवालेही सानपाडा व इतर ठिकाणी बिनधास्तपणे व्यवसाय करत होते. नागरिकांना नियमांची माहिती व्हावी यासाठी पोलीस व महानगरपालिकेचे पथक शहरभर गस्त घालत होते. लाऊडस्पीकरवरून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात होते. महामार्ग व शहरातील सर्व रत्यांवरून वाहतूक सुरू सुरळीत सुरू होती. या सुविधा सुरू राहणाररुग्णालये, डायग्नोस्टिक सेेंटर, दवाखाने, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मसी, फार्मस्युटिकल कंपन्या व इतर वैद्यकीय सुविधा.प्रवासी वाहतूक रेल्वे, टॅक्सी, रिक्षा व सार्वजनिक बस सुविधा.विविध देशांचे राजदूत व त्यांच्या कार्यालयाशी संबंधित सेवा.स्थानिक प्राधिकरणाद्वारे केली जाणारी मान्सूनपूर्व कामे.स्थानिक प्राधिकरणाद्वारे परवानगी असलेल्या सर्व सार्वजनिक सुविधा.पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने.डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी माहिती तंत्रज्ञान संबंधित महत्त्वाच्या पायाभूत सुविधा व सेवा.शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा, ई कॉमर्सशेतीविषयी कामेया गोष्टी राहणार बंदसर्व चौपाट्या, उद्याने, सार्वजनिक मैदाने पूर्णवेळ बंद राहणार.अत्यावश्यक सुविधा वगळून सर्व दुकाने, बाजारपेठा, पानशॉप, मॉल्स, केश कर्तनालय, सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्ण दिवसभर बंद.सर्च चित्रपटगृह, नाट्यगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा बंद राहणार.धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद राहणार.शाळा, महाविद्यालये, क्लासेस बंदसर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांवर बंदीया गोष्टींवर निर्बंध लागू राहतीलहॉटेल, रेस्टारंटमधून फक्त सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरू राहील.लग्नसमारंभासाठी फक्त ५० नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी.अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त २० नागरिकांना परवानगी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या