शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांविना होणार साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 01:53 IST

पनवेल तालुक्यातील शाळा : शिक्षण विभागाने दिल्या सूचना

कळंबोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच शाळांमध्ये विद्यार्थ्यांविना स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. याबाबत प्रशासनाने परिपत्रक काढून पनवेल तालुक्यातील शाळांना कळविण्यात आले आहे.पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद, महापालिका शाळा , खासगी शिक्षण संस्था, महाविद्यालयामध्ये दरवर्षी स्वतंत्र्य दिनानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. लहान मुलांमध्ये मोठी उत्सुकता असते, परंतु यंदा कोरोनाच्या संसर्गाच्या महामारीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत.१५ आॅगस्ट, २०२०ला भारतीय स्वातंत्र्याचा ७३वा वर्धापन दिन आहे. मात्र, कार्यक्रमावर कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे शाळा स्तरावर सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांपूर्वी ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात यावा, तसेच कार्यक्रमांतर्गत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय समिती सदस्यांना मुभा देण्यात आली आहे.तर, शाळेत या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना बोलविण्यात येऊ नये, अशा सूचना प्राथमिक व माध्यमिक शाळांना पनवेल तालुका गट शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांनी परिपत्रकाद्वारे सर्व शाळांना कळविण्यात आले आहे.प्रथमच मुलांविना ध्वजारोहणभारत स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदाच शाळांमध्ये विद्यार्थ्यांविना ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. आतापर्यंत अतिवृष्टी, तसेच पूर आला असल्यास क्वचितच रायगड जिल्ह्यात विद्यार्थ्यांविना ध्वजारोहण झाले असेल, परंतु कोरोनामुळे पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांविना शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन