शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराने तोडली रेल्वेची संरक्षण भिंत

By admin | Updated: February 29, 2016 02:13 IST

सानपाडा रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्मचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रेल्वेची संरक्षण भिंत तोडली आहे. कामगारांना रेल्वे पटरी ओलांडून बांधकाम साहित्य घेवून जावे लागत

नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्मचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रेल्वेची संरक्षण भिंत तोडली आहे. कामगारांना रेल्वे पटरी ओलांडून बांधकाम साहित्य घेवून जावे लागत आहे. यामुळे कुर्ला ते विद्याविहारप्रमाणे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हार्बर मार्गावर सानपाडा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर लादी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी कामगारांना डोक्यावरून वाळू, खडी व सिमेंट घेवून यावे लागत आहे. बांधकाम साहित्य घेवून येण्यासाठी ठेकेदाराने चक्क संरक्षण भिंत तोडून रस्ता तयार केला आहे. कामगारांना पनवेलवरून सीएसटीकडे जाणारा ट्रॅक ओलांडून साहित्य घेवून जावे लागत आहे. रेल्वे पटरी ओलांडून बांधकाम साहित्य घेवून जाताना कुर्ला व विद्याविहार दरम्यान चार कामगारांचा गत आठवड्यात मृत्यू झाला होता. यानंतरही रेल्वे प्रशासन अद्याप जागे झालेले नाही. सानपाडामध्येही अपघात होवून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)ठेकेदारावर गुन्हा दाखल करारेल्वे स्टेशनमध्ये काम करणाऱ्या ठेकेदाराने संरक्षण भिंत तोडली आहे. कामगारांचा जीव धोक्यात घालून त्यांना रेल्वे पटरी ओलांडण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा संबंधितावर दाखल करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.