शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांची दादागिरी

By admin | Updated: October 27, 2016 04:09 IST

कामगारांच्या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. रोगराई वाढू नये यासाठी शिवसेना व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी कचरा उचलण्याचा प्रयत्न केला

नवी मुंबई : कामगारांच्या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. रोगराई वाढू नये यासाठी शिवसेना व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी कचरा उचलण्याचा प्रयत्न केला पण कामगारांनी दादागिरी करून कचरा उचलू दिला नाही. कचरा उचलणार नाही व उचलूही देणार नाही अशी भूमिका घेवून शहरवासीयांना वेठीस धरले आहे. पगारवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. रविवारपासून शहरातील साफसफाईची कामे ठप्प आहेत. रूग्णालयामधील साफसफाई झालेली नसल्याने रूग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. महापालिका प्रशासनाला चार दिवसांमध्ये मार्ग काढण्यात यश आलेले नाही. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने कचरा उचलण्यास सुरवात केली आहे. तुर्भे इंदिरानगर परिसरामध्ये शाखा प्रमुख महेश कोठीवाले, तय्यब पटेल व इतर पदाधिकाऱ्यांनी डंपर व खाजगी कामगारांच्या मदतीने कचरा उचलण्यास सुरवात केली पण कंत्राटी कामगारांनी कचरा उचलून देण्यास तीव्र विरोध केला. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होवू शकतो असे निदर्शनास आणूनही कामगारांनी व त्यांच्या नेत्यांनी अरेरावी सुरूच ठेवल्याने कचरा उचलता आला नाही. याविषयी शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली असून याविषयी महापालिका व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. महापालिका प्रशासनाने मात्र कचऱ्यासाठी पूर्णपणे ठेकेदारांना जबाबदार धरले आहे. ठेकेदारांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्याचे आदेश विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. कर्मचाऱ्यांना पगार देण्याची जबाबदारी पूर्णपणे ठेकेदाराची आहे. कंत्राटदाराने सार्वजनिक आरोग्याला बाधा येईल अशा प्रकारे वर्तन करू नये. रस्ते, पदपथ, कचरा कुंडीजवळील कचरा व्यवस्थित गोळा करून ठेवणे आवश्यक आहे पण सद्यस्थितीमध्ये शहरात कचऱ्याचे ढीग तयार झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केले असल्यामुळे संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत अशा सूचना अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या आहेत. ठेकेदार गुन्हेगार कसे?महापालिका प्रशासनाने ठेकेदारांच्या कामांना पुढील वर्षासाठी मंजुरी दिली नाही. याविषयी प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर घाईगडबडीत सहा महिन्यांची मुदत वाढवून दिल्याची घोषणा केली आहे. वास्तविक चूक प्रशासनाची असताना त्याचे खापर ठेकेदारांवर फोडण्यात येत असल्याबद्दल ठेकेदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.कंत्राटी कामगारांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत. त्यांनी आंदोलन करण्यास आमचा विरोध नाही पण शहरात कचऱ्याचे ढीग तयार झाल्यामुळे नागरिक आमच्याकडे तक्रार करत होते. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू नये यासाठी आम्ही स्वखर्चाने कचरा उचलण्यास सुरवात केली होती पण कामगारांच्या विरोधामुळे कचरा उचलता आलेला नसून घडलेल्या प्रकाराविषयी महापालिका व पोलिसांकडे तक्रार केली आहे. - महेश कोठीवाले, शाखा प्रमुख, शिवसेना