शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांसाठी आता कन्स्ट्रक्शन अ‍ॅकॅडमी

By admin | Updated: February 25, 2016 04:18 IST

बांधकाम क्षेत्रात आपले करिअर करू इच्छिणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने कन्स्ट्रक्शन अ‍ॅकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अ‍ॅकॅडमीतून प्रकल्पग्रस्तांना बांधकामाचे

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबईबांधकाम क्षेत्रात आपले करिअर करू इच्छिणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने कन्स्ट्रक्शन अ‍ॅकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अ‍ॅकॅडमीतून प्रकल्पग्रस्तांना बांधकामाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. भविष्यात येऊ घातलेल्या विविध प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांसाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. त्यानुसार त्यांच्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. यात स्पर्धात्मक परीक्षा, रोजगाराभिमुख, कौशल्य व उद्योजकता विकास आदी सात प्रशिक्षण कार्यक्रमांचा नुकतास शुभारंभ करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता कन्स्ट्रक्शन अ‍ॅकॅडमी सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. खांदेश्वर येथे ही अ‍ॅकॅडमी सुरू करण्याचा सिडकोचा मानस आहे. आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी प्रभावित क्षेत्र व नैना परिसरामुळे भविष्यात बांधकाम उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. सुमारे ५६१.७२ चौरस किलोमीटर क्षेत्रात नैना प्रकल्प आकारास येणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या सुमारे २५ किमी चौरस परिघातील २७० गावांच्या क्षेत्रातील जमीन शासनाने यासाठी आरक्षित केली आहे. यात रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण या तालुक्यांतील २५६ तर ठाणे तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. एकूणच भविष्यात बांधकाम उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांनाही या संधीचा लाभ घेता यावा, बांधकाम क्षेत्रात आपले करिअर घडविण्यासाठी त्यांच्यात उमेद व जिद्द निर्माण व्हावी, या उद्देशाने सिडकोने कन्स्ट्रक्शन अ‍ॅकॅडमीची योजना आखली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या तरुणांना या अ‍ॅकॅडमीत बांधकाम क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दोन ते तीन लाखांची कामे विनानिविदा प्रकल्पग्रस्तांना देण्याचे सिडकोचे धोरण आहे. परंतु अनेकांना या क्षेत्राचे ज्ञान नसल्यामुळे त्यांना या संधीचा लाभ घेता येत नाही. अशा प्रकल्पग्रस्तांना ही अ‍ॅकॅडमी उपयुक्त ठरेल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी व्यक्त केला आहे.