शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

हनुमाननगरला समस्यांचा विळखा

By admin | Updated: March 8, 2017 04:36 IST

तुर्भे नाका हनुमाननगरला समस्यांचा विळखा पडला आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे यापूर्वीच एका मुलाचा मृत्यू झाला असून पूर्ण वसाहतीवर अपघाताचे सावट

नवी मुंबई : तुर्भे नाका हनुमाननगरला समस्यांचा विळखा पडला आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे यापूर्वीच एका मुलाचा मृत्यू झाला असून पूर्ण वसाहतीवर अपघाताचे सावट पसरले आहे. नागरी सुविधांचाही बोजवारा उडाला असून समस्यांचा विळखा कधी सुटणार, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करू लागले आहेत. नवी मुंबईमधील सर्वात जुन्या झोपडपट्टीमध्ये हनुमाननगरचा समावेश होतो. शहराची निर्मिती सुरू झाल्यानंतर येथील दगडखाणी, रस्ते व इतर कामांसाठी मनुष्यबळ व बांधकाम साहित्य पुरविण्याचा ठेका बंजारा समाजाकडे होता. यामुळे येथे बंजारा वसाहत उभी राहिली. यानंतर टप्प्याटप्प्याने दगडखाण मजूर व इतरांनी या परिसरात वास्तव्य सुरू केले. हनुमाननगरबरोबर आंबेडकरनगर वसाहतही उभी राहिली. वाढलेल्या लोकसंख्येबरोबर येथील समस्याही वाढू लागल्या आहेत. हनुमाननगरमध्ये लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या ही सर्वात गंभीर समस्या बनली आहे. महावितरणने चार वर्षांपूर्वी मीटर बॉक्स बसविण्यासाठीचा ठेका दिला होता. पण ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले. सहा महिन्यांमध्ये सर्व मीटर रूमचे दरवाजे तुटले आहेत. याशिवाय पूर्ण वसाहतीमध्ये वीजवाहिन्या लोंबकळत आहेत. या मीटरबॉक्सला हात लागल्याने विजेचा धक्का बसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी येथील विजेचा पोल कापून उरलेले साहित्य तिथेच ठेवले होते. या पोलला विजेचा धक्का लागून एक तरूणाचा मृत्यू झाला. यानंतरही महावितरण प्रशासनाला जाग आलेली नाही. येथील वीजवाहिन्या व वीजमीटर दुरूस्त करण्यासाठीचे काम युद्धपातळीवर केले नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हनुमाननगरच्या मागील बाजूला एक २० ते २५ फूट खोल खड्डा होता. या खड्ड्याचा वापर कचराकुंडीप्रमाणे केला जात होता. पूर्ण खड्ड्यात कचरा टाकण्यात आला असून तो भूखंड ताब्यात घेवून तेथे उद्यान विकसित करण्याची मागणी केली जात आहे. या परिसरात बेकरी व इतर उद्योजकांनी गॅस सिलिंडर साठविण्यासाठी अतिक्रमण केले आहे. गॅसचा स्फोट होवून कोणत्याही क्षणी पूर्ण वसाहतीला आग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंबेडकर नगरमधील समस्याही वाढत आहेत. येथील व्यावसायिकांनी पदपथावर साहित्य ठेवले आहे. यामुळे पदपथावरून चालणे अशक्य झाले आहे. गटारांची स्थितीही बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरातील समस्या सोडविण्यासाठी यापूर्वीचे नगरसेवक अमित मेढकर, विद्यमान नगरसेविका पूजा मेढकर यांच्यासह शिवसेनेचे शाखा प्रमुख तय्यब पटेल व इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पण प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने समस्या गंभीर होत चालल्या आहेत. महापालिकेकडे पाठपुरावाशिवसेनेचे शाखाप्रमुख तय्यब पटेल यांनी हनुमाननगर व आंबेडकरनगरमधील समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन व महावितरणकडे पाठपुरावा सुरू केला आहे. डंपिंग ग्राऊंडचा प्रस्तावित सेल सुरू न करण्याची मागणी केली आहे. प्रश्न सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. भविष्यात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कोणाचा मृत्यू झाला तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींचाही पाठपुरावामाजी नगरसेवक अमित मेढकर व नगरसेविका पूजा गणेश मेढकर यांनीही वसाहतीच्या मागील बाजूला असणारी मोकळी जागा ताब्यात घ्यावी. तेथील कचरा काढून योग्य भरणी करण्यात यावी व या जागेचा उद्यानासाठी वापर करण्यात यावा अशी मागणी केली आहे. संजीवनी कॉरीच्या जागेवर डंपिंग ग्राऊंड तयार करण्यासही विरोध दर्शविला आहे.