शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
4
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
5
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
6
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
10
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
11
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
12
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
13
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
14
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
15
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
16
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
17
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
18
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
19
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
20
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

सीवूड स्टेशनसमोरील वृक्षांवर संक्रांत

By admin | Updated: November 11, 2016 03:33 IST

सीवूड रेल्वे स्टेशनच्या भूखंडावर एल अ‍ॅण्ड टीने उभारलेल्या टोलेजंग इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी पालिका प्रशासनाचीही धडपड सुरू आहे

नवी मुंबई : सीवूड रेल्वे स्टेशनच्या भूखंडावर एल अ‍ॅण्ड टीने उभारलेल्या टोलेजंग इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी पालिका प्रशासनाचीही धडपड सुरू आहे. इमारतीचा भव्यपणा दिसावा यासाठी समोरील ३७ वृक्ष तोडण्याची परवानगी महापालिकेने दिल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पर्यावरणाच्या रक्षणासाठी शुक्रवारपासून ‘चिपको आंदोलन’ सुरू केले जाणार आहे. हार्बर मार्गावरील सर्वात भव्य रेल्वे स्टेशन म्हणून भविष्यात सीवूड ओळखले जाणार आहे. एल अ‍ॅण्ड टीला स्टेशन विकसित करण्याचा ठेका देण्यात आला आहे. कंपनीने सर्वप्रथम रेल्वे स्टेशन विकसित करून तेथे अत्याधुनिक सुविधा देणे अपेक्षित होते; पण कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात स्टेशनची उभारणी केली असली तरी प्रवाशांना ये-जा करण्यासाठी फक्त एका बाजूलाच मार्गिका ठेवण्यात आली आहे. अपंग, ज्येष्ठ नागरिक व इतर सर्वच नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशांना अपुऱ्या सुविधा दिल्या जात असताना दुसरीकडे व्यावसायिक इमारतीमधील दुकाने व कार्यालये सुरू करण्यासाठी इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेनेही आवश्यक त्या परवानग्या देण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने आम्ही ९०० वृक्ष लावले असल्याचे लेखी दिल्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र लवकरच दिले जाणार आहे, पण प्रत्यक्षात या वृक्षांची पाहणी करण्याची मागणी केली जात आहे. महापालिकेने येथील पदपथाच्या बाजूला १५ वर्षांपूर्वी वृक्ष लागवड केली आहे. पेल्टोफोरम नावाचे वृक्ष १५ ते १६ फूट उंच झाले आहेत. यामधील ३७ वृक्ष तोडण्याची परवानगी कंपनीने मागितली असून पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने तत्काळ परवानगी दिली आहे. यासाठी सूचना व हरकतीची नोटीस स्थानिक दैनिकामध्ये दिली होती, पण जे दैनिक सीवूड परिसरातील नागरिकांच्या वाचनामध्ये येणार नाही याची दक्षता घेऊन नोटीस दिली होती. दोन दिवसांपासून वृक्षतोड व छाटणी सुरू झाली याविरोधात आंदोलन छेडण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)