शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

औषध विक्रेत्यांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: May 31, 2017 06:27 IST

आॅनलाइन औषध विक्रीविरोधात शहरातील केमिस्ट संघटनेने मंगळवारी एक दिवसाचा बंद पाळला. आॅनलाइन औषध विक्रीच्या

नवी मुंबई : आॅनलाइन औषध विक्रीविरोधात शहरातील केमिस्ट संघटनेने मंगळवारी एक दिवसाचा बंद पाळला. आॅनलाइन औषध विक्रीच्या संदर्भात शासनाने कायदा करताना औषध विक्रेत्यांना विश्वासात घेतले नसल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. त्यानुसार सानपाडा येथे बैठक घेवून शासनाने या आंदोलनाची देखील दखल न घेतल्यास पुढच्या भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली.शासनाने ग्राहकांच्या सोयीनुसार काही औषधांची आॅनलाइन विक्री करण्याला मंजुरीच्या हालचाली चालवल्या आहेत. त्याकरिता नवा कायदा देखील तयार केला जात आहे. या कायद्यानुसार आॅनलाइन व ई-पोर्टल याद्वारे औषधांची विक्री शक्य होणार आहे. परंतु हा कायदा करताना शासनाने औषध विक्रेत्यांना विश्वासात घेतले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे केमिस्ट संघटनेकडून राज्यव्यापी बंदची घोषणा करण्यात आलेली. त्यानुसार नवी मुंबई केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे नवी मुंबईत एक दिवसीय बंदचे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये शहरातील सुमारे ६०० औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यांच्याद्वारे नवी मुंबई ते आझाद मैदान दरम्यान मोटारसायकल रॅली देखील काढली जाणार होती. मात्र आझाद मैदानावर रॅलीची परवानगी न मिळाल्यामुळे सानपाडा येथील केमिस्ट भवनमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राकेश नलावडे, सचिव सुनील छाजेड, राजेंद्र जाधव, लालाराम चौधरी, शंकर जेजुरकर, संदीप देशमुख, भुंडाराम चौधरी आदी उपस्थित होते. या आंदोलनानंतरही शासनाने औषध विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेतली नाही, तर पुढची भूमिका ठरवण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे छाजेड यांनी सांगितले. आॅनलाइन औषध विक्रीसंदर्भात कायदा झाल्यास औषध विक्रेत्यांना त्याची अंमलबजावणी करण्यात काही अडचणी उद्भवणार आहेत. त्याची दखल शासनाने घेण्याची गरज असून, सरकारला त्याची जाणीव करुन देण्याच्या उद्देशाने हा बंद करण्यात आल्याचेही सुनील छाजेड यांनी सांगितले.