शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक कॉरिडोरसाठी सक्तीचे भूसंपादन?

By admin | Updated: May 7, 2017 06:19 IST

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यासाठी आवश्यक जमिनीपैकी ३० टक्के जमीन अद्याप संपादित होणे बाकी

लोकमत न्यूज नेटवर्करोहा : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यासाठी आवश्यक जमिनीपैकी ३० टक्के जमीन अद्याप संपादित होणे बाकी आहे. सामंजस्याने जमीन संपादित करण्याबाबतचे प्रयत्न असफल होत असल्याने शासनाकडून सक्तीने भूसंपादन करण्याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला आहे. रोहा तालुक्यातील जामगाव, पाथरशेत व पहूर या गावांमधील जमीन पहिल्या टप्प्यातील औद्योगिक कॉरिडोरसाठी संपादित होणार आहे; परंतु स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. जागतिकीकरण विरोधी मंचाच्या नेत्या उल्का महाजन यांच्या नेतृत्वाखाली बाधित ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे.प्रकल्पासाठी सलग जागा आवश्यक असून, संपादित जागेलगत असणारी जागा शेतकऱ्यांनी दिलेली नसल्याने सक्तीने भूसंपादन करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू असून, जिल्हा प्रशासनाने याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सुपूर्द केला आहे. ५ वर्षांपासून हा लढा चालू असून विरोधक सत्ताधारी झाले आणि सत्ताधारी विरोधक झाले; परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे बघण्यास मात्र कोणीही तयार नाही, असे दिसत आहे.प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना १५ टक्के विकसित भूखंड नको असल्यास हेक्टरी ४६ लाख तर विकसित भूखंड हवा असल्यास हेक्टरी ३२ लाख ५० हजार रुपये दर शासनाने निश्चित केला आहे. जागा न देण्याबाबत शेतकरी अद्यापही ठाम आहे. यामुळे दिल्ली- मुंबई औद्योगिक पट्ट्याचा प्रश्न भविष्यात चिघळण्याची शक्यता आहे.प्रकल्पाच्या माध्यमातून जपानकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतात येणार असल्याने केंद्र सरकारकडून हा प्रकल्प पुढे रेटण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. यापूर्वीदेखील रायगड जिल्ह्यातील अनेक जमिनी विविध प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आल्या आहेत.