शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील महापौरांकडून कौतुक

By admin | Updated: May 21, 2017 03:24 IST

शातील विविध महापालिकांच्या महापौरांच्या शिष्टमंडळाने शनिवारी नवी मुंबई महापालिकेला भेट दिली. या वेळी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेत, महापालिकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : देशातील विविध महापालिकांच्या महापौरांच्या शिष्टमंडळाने शनिवारी नवी मुंबई महापालिकेला भेट दिली. या वेळी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेत, महापालिकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.विविध विकासकामांच्या माध्यमातून, तसेच मिळालेल्या पुरस्कारांमुळे नवी मुंबई महापालिकेचा सध्या देशभरात नावलौकिक होत आहे. त्यामुळे अनेकांना नवी मुंबई महापालिकेच्या कार्यपद्धती व ध्येय धोरणांची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली आहे. त्यामध्ये इतर ठिकाणच्या राजकीय व्यक्तींसह शासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या उद्देशाने गतकाळात अनेकांनी महापालिकेला भेटही दिलेली आहे. अशातच शनिवारी देशातील विविध महापालिकांच्या महापौरांच्या शिष्टमंडळाने महापालिकेला भेट दिली. या वेळी महापौर सुधाकर सोनावणे, सभागृहनेते जयवंत सुतार यांनी त्यांना पालिकेच्या संपूर्ण विकासकामांची माहिती दिली. पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत नवी मुंबईतल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेची व अत्याधुनिक सेवा-सुविधांची माहिती घेऊन प्रत्यक्षात पाहणीही केली. या वेळी पंजाबमधील जालंदरचे महापौर सुनील ज्योती, लुधियानाचे महापौर हरचरण सिंग गोहलवाडीया, छत्तीसगढमधील रायपूरचे महापौर प्रमोद दुबे, बिलासपूरचे महापौर किशोर राय, सिक्कीम मधील गंगटोकचे महापौर शक्ती सिंग, मध्यप्रदेशमधील रेवाच्या महापौर ममता गुप्ता, देवासचे महापौर सुभाष शर्मा, आंध्रप्रदेशमधील अनंतपूरचे महापौर एम. स्वरूपा, गंगटोकचे आयुक्त शेवांग गायछो आदी उपस्थित होते. त्यांनी महापालिका मुख्यालयाची पाहणी करून आवारातील २२५ फूट उंचीचा प्रतीकात्मक राष्ट्रध्वज व इतर बाबी प्रभावीत करणाऱ्या असल्याचे मत व्यक्त केले.यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकाल्पांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. पाणीवितरण, घनकचऱ्याची विल्हेवाट, स्वच्छता अभियान व ईटीसी केंद्र आदी प्रकल्पांना विविध स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत.