शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गाढी नदीवरील पुलाचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:09 IST

पनवेल शहरातील वाहतूककोंडीचे ग्रहण लवकरच सुटण्याची शक्यता आहे.

- वैभव गायकरपनवेल : पनवेल शहरातील वाहतूककोंडीचे ग्रहण लवकरच सुटण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावर पनवेलमधून सुमारे तीन पूल व एक भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून, पैकी गाढी नदीवरील काम पूर्णत्वास आल्याने लवकरच याठिकाणी चालकांची रखडपट्टी दूर होणार आहे.एमएसआरडीसीअंतर्गत हे काम केले जात आहे. महामार्गाचे रु ंदीकरण व नव्याने तीन पूल बांधण्याच्या कामाला मागील वर्षभरापासून सुरु वात करण्यात आली आहे. सुमारे ३९ कोटी निधी खर्चून या मार्गावर ३ नवीन पूल व १ भुयारी मार्ग बांधण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे खांदा वसाहत सिग्नल व पंचमुखी हनुमान मंदिर याठिकाणीही असलेली नित्याची वाहतूककोंडी देखील संपुष्टात येणार आहे. खांदा वसाहत येथील उड्डाणपुलाचे कामही सध्या वेगाने सुरू आहे. अनेक वर्षे याठिकाणच्या एकाच पुलावरून वाहतूक सुरू असल्याने मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. पनवेल शहरात प्रवेश करणारा हा एकच मार्ग असल्याने याठिकाणच्या पुलाचे रु ंदीकरण होणे आवश्यक होते. टीआयपीएल कंपनीमार्फत हे काम करण्यात येत आहे .१ फेब्रुवारी २०१७ रोजी या मार्गावर कामाला सुरु वात करण्यात आली आहे. यापैकी काळुंद्रे येथील पुलाचे काम रखडले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी या पुलाखालून गेल्याने या जलवाहिनीच्या अडथळ्यामुळे हे काम रखडले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अडथळ्यामुळे या कामाची मुदत २५ मार्च २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अशी माहिती एमएसआरडीसीचे अधिकारी एस गांगुर्डे व अधीक्षक अभियंता पी . औटी यांनी दिली .>काळुंद्रे पुलाचे काम लवकरच पूर्ण होणारकाळुंद्रे पुलाखालून एमजेपीची जलवाहिनी गेली आहे. ही जलवाहिनी हटविण्यासाठी लागणाऱ्या उशिरामुळे या पुलाचे काम रखडले आहे. मात्र, एमएसआरडीसीमार्फत ही जलवाहिनी न हटवता पर्यायी विचार करून पुलाचे काम पूर्णत्वाला नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याने २0१९ च्या सुरु वातीला हे काम देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे.