शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षांसाठी स्मार्ट अभ्यास करणे आवश्यक

By admin | Updated: December 26, 2016 07:12 IST

स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर जास्त नव्हे, तर स्मार्ट अभ्यास करणे आवश्यक आहे, असा सल्ला नवी मुंबई

ठाणे : स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर जास्त नव्हे, तर स्मार्ट अभ्यास करणे आवश्यक आहे, असा सल्ला नवी मुंबई पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांना दिला.विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातील नवरंग महोत्सवात प्रमुख पाहुणे ते बोलत होते. अभ्यास किती केला, किती वेळा केला, कोणती पुस्तके वाचली, किती वाचली याचा आणि यशाचा काहीही संबंध नसतो. स्पर्धा परीक्षांत यश प्राप्त करायचे असेल, तर जास्तीतजास्त गुण मिळवणे हे ध्येय असले पाहिजे. बेस्ट गुण मिळवण्यासाठी बेस्ट उत्तरे लिहिण्याकडे कल असला पाहिजे. उत्तर पूर्ण आणि ते योग्य असणे यालाच बेस्ट उत्तर म्हणतात. उत्तराचेही भाग असतात, हेच माहीत नसते. उत्तराचे जितके भाग असतात, तितकेच गुण मिळत असतात. अभ्यासक्रम वाचून अभ्यास करण्यापेक्षा प्रश्नांचा अभ्यास करा आणि त्या अनुषंगाने उत्तरे वाचा आणि लिहा. यामुळे परीक्षा तंत्र आणि उत्तरे लिहिण्याची पद्धत समजेल. स्पर्धा परीक्षा म्हणजे ज्ञानाची परीक्षा नसते, तर तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या आधारे काय करता येईल, हे विचारलेले असते. प्रत्येक स्पर्धा परीक्षेचे स्वरूप वेगळे असते. दर दोन ते चार वर्षांनी स्पर्धा परीक्षांचा पॅटर्न बदलतो. जे वाचता त्यावर विचार करून उत्तरे लिहावी. हे तंत्र वापरल्यास यश नक्कीच मिळेल. समर्पण आणि एकाग्रतेने काम केल्यास कमी वेळेत जास्त यश मिळते. तुमचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हे तुम्ही स्वत:च असले पाहिजे. तुमच्यात स्वत:ला शोधा. स्वत:चे चांगले आणि वाईट गुण समजून घ्या आणि त्यानंतर वाईट गुण कमी करून चांगले गुण वाढवा. हुशारी ही ज्ञानावर नव्हे, तर तुमच्या वागण्यावरून आपोआप समजते. जीवनात यशस्वी होण्यासाठी आनंदाने जगा. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह यांनी भूषवले. (प्रतिनिधी)