शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळे, सारसोळे, वाशीतील 460 मच्छीमारांना मिळणार नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 23:08 IST

न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्पातील बाधित : मंदा म्हात्रे यांचा पुढाकार

n  लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: न्हावासेवा-शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नवी मुंबईतील दिवाळे, सारसोळे आणि वाशी येथील मच्छीमारांना लवकरच नुकसान भरपाईचे वाटप केले जाणार आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या संदर्भात एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ.के.एच. गोविंदराज यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार, लवकरच नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन के.एच. गोविंदराज यांनी दिल्याचे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले .एमएमआरडीएच्या बहुचर्चित न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील दिवाळे, सारसोळे, वाशी येथील मच्छीमारांचे मोठे नुकसान होणार आहे. या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी गेल्या वर्षी संबधित विभागाकडे केली होती. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी अलीकडेच एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ.के.एच. गोविंदराज यांची भेट घेऊन चर्चा केली. एमएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या ४६0 मच्छीमारांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. त्यानुसार, या संदर्भात पंधरा दिवसांत कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीकडून स्पष्ट करण्यात आल्याचे मंदा म्हात्रे यांनी सांगितले. दोन टप्प्यात नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचेही एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी वरिष्ठ अभियंता गणेश देशपांडे, भाजप युवामोर्चा महामंत्री जगन्नाथ कोळी, अनंता बोस, तुकाराम कोळी, प्रेमनाथ कोळी, सुनील बाये, कैलास कोळी, ज्ञानेश्वर कोळी उपस्थित होते.सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मागील दीड वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील मच्छीमारांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मच्छीमारांची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी आपली भूमिका आहे. त्यानुसार, एमएमआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, पुढील पंधरा दिवसांत टप्प्याटप्प्याने भरपाई वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.    -मंदा म्हात्रे, आमदार 

टॅग्स :fishermanमच्छीमार